महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीमध्ये दिराशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पत्नीची निर्घृण हत्या; पती गजाआड - गजाआड

मोठ्या दिराशी संबंध ठेवणाऱ्या पत्नीची पतीने रागाच्या भरात धारदार चाकूने निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

भिवंडीमध्ये दिराशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पत्नीची निर्घृण हत्या; पती गजाआड

By

Published : Jun 17, 2019, 7:23 PM IST

ठाणे- मोठ्या दिराशी संबंध ठेवणाऱ्या पत्नीची पतीने रागाच्या भरात धारदार चाकूने निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीच्या म्हाडा कॉलनीतील गफूरवस्ती भागात घडली आहे. या प्रकरणी पतीविरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पतीला गजाआड केले आहे. आलम गफार अन्सारी (वय 28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, आरोपी आलम मृत पत्नी नाजीया व 1 वर्षाच्या मुलीसह म्हाडा कॉलनी, गफूरवस्ती भागात राहत आहे. आलम गंवडी काम करून कटूंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचा 2 वर्षापूर्वी नाजीयाशी निकाह झाला आहे. मात्र, काही महिन्यांपासून नाजीयाचे आलमच्या मोठ्या भावासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याच्या मनात होता.

रविवारी 16 जून रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आलम कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर तो काही कामानिमित्त पुन्हा घरी आला. त्यावेळी पत्नी नाजीया आणि त्याच्या मोठ्या भावाचे शारीरिक संबंध सुरू असल्याचे त्याला दिसले. हे दृश्य पाहून त्याला राग अनावर झाला. या रागातून त्याने पत्नीवर चाकूने 8 ते 10 वार करून तिला गंभीर जखमी केले. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून आरडाओरडा करत होती.

त्यावेळी तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेऊन नाजीयाला इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच निजामपुरा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पती आलम अंसारी यास ताब्यात घेतले. याप्रकरणी आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बि.डी. जाधव करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details