महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा; गुंगीचे औषध देऊन चिरला गळा - पतीची हत्या

अंबरनाथ तालुक्यातील डोणेगाव उल्हासनदी पात्रात १३ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच कुळगाव पोलीस घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला.

husband-murder-by-wife-with-boyfriend-in-thane
husband-murder-by-wife-with-boyfriend-in-thane

By

Published : Jan 15, 2020, 9:53 PM IST

ठाणे- महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील डोणेगावात घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे पत्नीने पतीला दारू पाजून त्याला गुंगीचे औषध दिले. प्रियकराला घरात बोलवून पत्नीने पतीचा गळा ओढणीने आवळला.

हेही वाचा-कमरेपर्यंतच्या बर्फातूनही काढली वाट; लष्कराने वाचवले गर्भवती महिलेचे प्राण

त्यांनतर प्रियकराने धारदार चाकूने त्याचा गळ्यावर वार केले. त्याच रात्री पुरवा नष्ट करण्याच्या हेतून त्या दोघांनी मिळून मृतदेह वांगणी नजिक असलेल्या डोणेगाव येथील उल्हास नदी पात्रात फेकून दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. विजय विश्वकर्मा असे निर्घृण हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. तर चाहत असे आरोपी पत्नीचे नाव असून विराज पालांडे असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. कुळगाव पोलिसांनी या दोन्ही आरोपींना शिताफीने अटक केली आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ तालुक्यातील डोणेगाव उल्हासनदी पात्रात १३ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच कुळगाव पोलीस घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. त्यांनतर शवविच्छेदनाच्या अहवालात गळ्यावर धारदार शस्राने वार करून तसेच गळा दाबून जीवे ठार मारल्याचे उघडकीस झाले. यामुळे पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी स्थानिक पोलीस व ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.

पोलिसांना बातमीदाराकडून मृत हा डोणेगावातील एका चाळीत राहणार असल्याचे समजले. त्यांनतर पोलिसांनी मृत विजयचे घर गाठून त्याच्या पत्नीकडे अधिक चौकशी केली. यात तीने उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय बळावल्याने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत मृत विजय हा प्लंबरचे काम करीत होता. तो दोन वर्षांपासून डोणेगावात पत्नी सोबत राहत होता. यादरम्यान परिसरात राहणारा विराज याच्याशी ८ महिन्यापूर्वी पत्नी चाहत हिच्याशी ओळख झाली. विराज हा वाहन चालक असल्याने काही दिवसात या दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळले. याचीच कुणकुण पतीला लागल्याने पत्नीशी तो वाद घालत होता. यामुळे पत्नी व तिचा प्रियकर विराज यांनी कायमचा विजयचा काटा काढण्याची योजना आखली.

ठरल्याप्रमाणे १२ जानेवारी रात्रीच्या सुमारास घरात विजयला दारू पाजली. त्यामध्ये गुंगीचे औषध दिले. त्यामुळे विजय बेशुद्ध झाल्याचे पाहून मध्यरात्रीच्या सुमाराला प्रियकराला घरात बोलवून विजयचा ओढणीने गळा आवळला. त्यांनतर तिच्या प्रियकराने गळ्यावर चाकूने वार करून ठार मारले. त्याचा मृतदेह पुरवा नष्ट करण्याच्या हेतून त्या दोघांनी मिळून वांगणी नजिक असलेल्या डोणेगाव येथील उल्हास नदी पात्रात फेकून दिला. अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details