ठाणे- डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दाम्पंत्याने 6 वर्षाच्या चिमुकलीसह गळफास लावून आत्महत्या केली. मालमत्तेच्या वादातून भावाच्या त्रासाला कंटाळू दाम्पत्याने हे पाऊल उचलले आहे. शिवराम पाटील आणि दिपाली पाटील असे त्या दाम्पत्याचे नाव आहे.
शेवटची इच्छा मालमत्ता अनाथ आश्रमाला द्या!, ठाण्यातील दाम्पत्याची मुलीसह आत्महत्या - ठाणे आत्महत्या बातमी
शिवराम पाटील यांनी सुसाईड नोटमध्ये आई गुणाबाई पाटील यांचा या आत्महत्येशी काहीच संबंध नाही असे स्पष्ट केले आहे. माझी मालमत्ता, दागिने अशी संपत्ती माझ्या पत्नीचा भाऊ श्रीनाथ किणे यांच्याकडे देऊन ती मालमत्ता अनाथ आश्रमाला द्या, असे स्पष्ट नमूद केले आहे.
शिवराम यांचे मालमत्तेच्या वादातून त्यांच्या भावसोबत बिनसले होते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होता. त्यामुळे भावांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून शिवराम पाटील, त्यांची पत्नी दिपाली आणि चिमुरडी यांनी सोमवारी पहाटे गळफास लाऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी शिवरामने एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात वसंत रामा पाटील, रमाकांत पाटील यांच्यासह काशिनाथ रामा पाटील, चंद्रकांत रामा पाटील, नागनाथ रामा पाटील, सुवर्णा रमाकांत पाटील, शोभा चंद्रकांत पाटील, रोशन चंद्रकांत पाटील, प्रवीण चंद्रकांत पाटील, मनोहर वसंत पाटील, सुभद्रा वसंत पाटील वैभव चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. डायघर पोलीस ठाण्यात या 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून डायघर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शेवटची इच्छा मालमत्ता अनाथ आश्रमाला द्या...
शिवराम पाटील यांनी सुसाईड नोटमध्ये आई गुणाबाई पाटील यांचा या आत्महत्येशी काहीच संबंध नाही असे स्पष्ट केले आहे. माझी मालमत्ता, दागिने अशी संपत्ती माझ्या पत्नीचा भाऊ श्रीनाथ किणे यांच्याकडे देऊन ती मालमत्ता अनाथ आश्रमाला द्या, असे स्पष्ट नमूद केले आहे. तर बहीण जनाबाई अशोक साळुंखे हिचे 50 हजार रुपये आणि गंठण तिला परत द्यावे. याशिवाय या चिठ्ठीतील व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी असे लिहिण्यात आले आहे.