ठाणे- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला मारहाण केली. तसेच तिला जबरदस्तीने झोपेच्या गोळ्या खायला घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिवंडीतील साठेनगर परिसरात ही घटना घडली आहे.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला बेदम मारहाण; जीवे मारण्यासाठी पतीने दिल्या झोपेच्या गोळ्या - character suspicion
पती कोणताही कामधंदा न करता दारुच्या आहारी गेल्याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिला सतत मारहाण करीत होता. गेल्या ३ दिवसांपासून त्याने पत्नी अनिताला मारहाण सुरू केली होती. शुक्रवारी त्याने दारूच्या नशेत अनिताला मारहाण करून जबरदस्तीने झोपेच्या गोळ्या खायला दिल्या आणि त्याने घरातून पोबारा केला.
अनिता गायकवाड (वय ३०), असे बेशुद्ध अवस्थेत उपचार घेत असलेल्या पत्नीचे नाव आहे, अंकुश गायकवाड, असे आरोपी पतीचे नाव आहे. पीडित अनिताचा १५ वर्षांपूर्वी आरोपी अंकुश गायकवाड यांच्या सोबत विवाह झाला आहे. ती पती अंकुश आणि चार मुलांसह साठेनगर येथील झोपडपट्टीत राहत आहे. मात्र, पती कोणताही कामधंदा न करता दारुच्या आहारी गेल्याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिला सतत मारहाण करीत होता. गेल्या ३ दिवसांपासून त्याने पत्नी अनिताला मारहाण सुरू केली होती. शुक्रवारी त्याने दारूच्या नशेत अनिताला मारहाण करून जबरदस्तीने झोपेच्या गोळ्या खायला दिल्या आणि त्याने घरातून पोबारा केला.
घटनेची माहिती शेजाऱ्यांना समजताच त्यांनी कामतघर येथील अनिताच्या आईला कळवले. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आपल्या मुलीला बेशुध्द अवस्थेत स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नारपोली पोलीस ठाण्यात या घटनेबाबत पत्नी अनिताने व्यसनाधिन पती अंकुश याच्याविरोधात तक्रार दिल्याने पोलिसांनी अंकुशला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.