मनसे आमदार प्रमोद पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो मनसैनिकांना पोलिसांकडून नोटीस; तर लाउडस्पीकर विना अजान - मनसे आमदार प्रमोद पाटील
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पासून मशिदीवरील भोंगे काढुन टाकणेबाबत चेतावणी दिली आहे. तसे न केल्या अजानच्या वेळी मशिदीसमोर लाउडस्पीकर लावुन हनुमान चालीस पठण करण्याचे आवाहन केले होते. याबाबत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मनाई आदेश लागु करण्यात आला आहे. सदर मनाई आदेशामध्ये पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा-प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई केली आहे.
ठाणे - राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे मशिदीवरील भोंग्याबाबत दिलेले अल्टीमेट आणि मशिदीसमोर लाउडस्पीकर लावुन हनुमान चालीस पठण करण्याचे आवाहन याची दखल म्हणून मानपाडा पोलीस ठाण्यातून मनसेचे एकमेव आमदार प्रमोद (राजू) पाटील यांसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातुन शेकडो मनसैनिकांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. तर कल्याण, भिवंडी मुरबाड, शहापूर, अंबरनाथ , बदलापूर , उल्हासनगर शहरातील मशिदीवर लाउडस्पीकर विनाच आज पहाटेची अजान झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
सुन्नी जामा मशिद ट्रस्टवतीने फतवा - भोंग्यावरून तापलेल्या राजकारण पाहता मुरबाड शहर व तालुक्यातील सुन्नी जामा मशिद ट्रस्टवतीने फतवा जारी करण्यात आला. या फतव्यातमध्ये नमूद केले, की यापुढे पहाटेची लाऊडस्पिकरवर होणारी अजान बंद केली जाईल. तसेच उर्वरीत अजान देखील न्यायालयाच्या नियमानुसार अदा करणार असल्याचे नमूद केले आहे. या फतव्याचे मनसेचे मुरबाड शहरध्यक्ष, नरेश देसले , यांनी सुन्नी जामा मशिद ट्रस्टचे अध्यक्ष मतीन पठाण यांचे आभार मानले, तसेच राजसाहेबांचा पुढिल आदेश येई पर्यंत तुर्तास सर्व मनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा आवाहानही मनसे शहरध्यक्ष, देसले यांनी केले आहे. ३ मे रोजी जिल्हातील शेकडो मनसेच्या स्थानिक नेत्यांना पोलिसांनी नोटीसी बजावून ताब्यात घेतले आहे. आज सकाळीच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष साळवी यांना भिवंडीतील नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश लागू -मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पासून मशिदीवरील भोंगे काढुन टाकणेबाबत चेतावणी दिली आहे. तसे न केल्या अजानच्या वेळी मशिदीसमोर लाउडस्पीकर लावुन हनुमान चालीस पठण करण्याचे आवाहन केले होते. याबाबत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मनाई आदेश लागु करण्यात आला आहे. सदर मनाई आदेशामध्ये पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा-प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई केली आहे. पोलीस उपायुक्त (विशेष शाखा, ठाणे) यांनी २८ एप्रिल अन्वये फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार दिनांक २९ एप्रिल सकाळीपासुन ते दिनांक २७ जून पर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मनाई आदेश लागु केला आहे. मानई आदेशात कोणत्याही धार्मिक स्थळा पासुन २०० मीटर परिसरात सार्वजनिकरितीने बेकायदेशिर जमाव करणे, घोषणावाजी करणे, गायन करणे, वाद्य वाजविने, विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर करणे, रॅली, मिरवणुक तसेच सभा घेणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते असल्याने अप्रत्यक्ष विना परवानगी एकत्र जमुन व गर्दी हाईल असे कार्यक्रमाचे आयेजन करू नये तयेच कोणत्याही धर्माच्या, जातीच्या अथवा व्यक्तीच्या भावना दुखवतील असे कोणतेही कृत्य करू नये ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.