महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रत्येकाच्या आठवणीतील 'लालपरी'चा इतिहास ठाणेकरांसाठी खुला - रेल्वे स्थानक

राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी (एस. टी) ने नुकतेच ७१ व्या वर्षात पदार्पण केले. या ७१ वर्षाच्या प्रवासात एस.टीत आमूलाग्र बदल झाले आहेत. या बदलाचा वेध घेणारा प्रवास राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने प्रदर्शनाद्वारे मांडण्यात आला. लोकवाहिनी असलेला एस. टी.चा हा प्रवास पाहण्याची संधी आज ठाणेकरांना मिळाली आहे.

प्रत्येकाच्या आठवणीतील 'लालपरी'चा इतिहास ठाणेकरांसाठी खुला

By

Published : Jun 14, 2019, 2:21 PM IST

ठाणे- राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी (एस. टी) ने नुकतेच ७१ व्या वर्षात पदार्पण केले. या ७१ वर्षाच्या प्रवासात एस.टीत आमूलाग्र बदल झाले आहेत. या बदलाचा वेध घेणारा प्रवास राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने प्रदर्शनाद्वारे मांडण्यात आला. लोकवाहिनी असलेला एस. टी.चा हा प्रवास पाहण्याची संधी आज ठाणेकरांना मिळाली आहे.

प्रत्येकाच्या आठवणीतील 'लालपरी'चा इतिहास ठाणेकरांसाठी खुला

या प्रदर्शनात एसटीचा १९४८ पासून ( बेडफोर्ड ) ते २०१९ ची रातराणी सिल्पर पर्यंतचा प्रवास फोटो फ्रेमच्या आधारे दाखावण्यात आला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असलेल्या एसटीने काळानूसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे.

राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तसेच गोरगरिब आणि वंचित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे, यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत. एसटीत काळानुसार झालेल्या बदलांचा वेध घेणारे फिरते प्रदर्शन एसटी महामंडळाच्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त तयार करण्यात आले आहे. वारी लालपरीची हे फिरते प्रदर्शन १० ते १४ जून दरम्यान ठाणे आणि पालघर जिल्ह्यात येणार आहे. १३ जूनला ठाणे बसस्थानक (ठाणे रेल्वे स्थानकाजवळ) तर कल्याण बसस्थानकात १४ जूनला हे प्रदर्शन असणार आहे.

बसस्थानकात असणार प्रदर्शन -

वारी लालपरीची हे प्रदर्शन सर्व बसस्थानकात सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत खुले आहे. महामंडळाच्या बसमध्ये हे प्रदर्शन मांडण्यात आलेले आहे. एसटीचा मागील ५ वर्षातील आमूलाग्र झालेला बदल हा प्रवासी वर्गाला कळावा व त्यांना एसटीच्या प्रवाशी सेवेचे अंतरंग उलगडून दाखवावेत, या उद्देशाने बसस्थानकावरील प्रवाशांना व सामान्य नागरिकांना हे प्रदर्शन मोफत पाहता येणार आहे. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे महामंडळाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details