कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना.. ठाणे पालिका रुग्णालयाचे १०० बेड "चाईल्ड कोरोना" म्हणून आरक्षित
ठाणे शहरात रुग्णांची संख्या कमी होत असल्याने पालिकेच्या हद्दीत दिलासादायक चित्र आहे. तसेच कोरोनावर मात करून घरी परतणाऱ्या रुग्णांचा आकडाही दिलासादायक आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. पालिके रुग्णालयाचे १०० बेट 'चाइल्ड कोरोना' म्हणून राखीव ठेवण्यात आले आहेत.
ठाणे -ठाणे पालिकेच्या हद्दीत दिलासादायक चित्र आहे. रुग्णांची संख्याही कमी होत आहे. तर कोरोनावर मात करून घरी परतणाऱ्या रुग्णांचा आकडाही दिलासा देणारा आहे. सहा दिवसात कोरोनाचे रुग्ण हजाराच्या आत आहे. मात्र येणाऱ्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या लाटेचा फटका लहान मुलांना बसण्याची शक्यता आहे. यासाठी पालिका प्रशासनाने पार्किंग प्लाझामध्ये अलिप्त १०० बेड "चाईल्ड कोरोना" म्हणून आरक्षित करणार असल्याचे ठाणे पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी सांगितले.