ठाणे - कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे राज्यातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता मात्र पावणे दोन वर्षांनंतर शाळेची घंटा वाजणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १ ली ते ८ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना शाळांमधून समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येकी २ गणवेशांसाठी ४ कोटी ९ लाख ९६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात १ ली ते ८ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांची संख्या ६८ हजार ३२६ इतकी आहे. विशेष म्हणजे गणवेशासाठी मिळणारी ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात देण्याऐवजी शाळा व्यवस्थापन समितीला गणवेश खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत.
ग्रामीण विद्यार्थ्यांना २ गणवेशांसाठी ६०० रुपयांची मंजूरी
जिल्ह्यात जिल्हा परिषद, नगरपालिका आणि अनुदानित शाळांमधून विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ गणवेश दिले जातात. परंतु मागच्या वर्षी कोविडमुळे शाळा बंद असल्याने प्रत्येकी एकच गणवेश मंजूर करण्यात आला होता. यामध्ये इयत्ता १ ली ते ८ वी पर्यतच्या सर्व विद्यार्थिनी, अनुसूचित जाती-जमाती संवर्गातील मुले व दारिद्रय रेषेखालील मुलांना गणवेश वाटप केले जातात. यावर्षी केंद्र सरकारने या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ गणवेश वाटपाचा निर्णय घेतला असून समग्र शिक्षा अभियानाने पाठविलेल्या आराखड्यानुसार ४ कोटी ९ लाख ९६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला २ गणवेशांसाठी ६०० रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचा ठाणे जिल्ह्यातील ६८ हजार ३२६ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
गणवेश वाटपाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन