महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CSMT पूल दूर्घटना : सरकारी अनास्थेच्या बळी ठरल्या भक्ती शिंदे, नातेवाईकांचा आरोप

सरकारी अनास्थेच्या बळी ठरल्या परिचारिका भक्ती शिंदे.... सीएसएमटी पूल दूर्घटनेनंतर भक्ती शिंदेंच्या नातेवाईकांचा आरोप... भक्तीच्या जाण्याने कुटुंबावर कोसळले मोठे संकट

भक्ती शिंदे

By

Published : Mar 15, 2019, 1:44 PM IST

ठाणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ३३ जण गंभीर जखमी झाले. मृतामध्ये एकाच ठिकाणी कामाला जाणाऱ्या तीन जीवलग मैत्रिणींचा समावेश होता. मात्र, भक्ती शिंदे आणि तिच्या मैत्रिणीसह ज्यांचा मृत्यू झाला हे सर्व सरकारी अनास्थेचे बळी ठरले असल्याचा आरोप भक्ती शिंदेंच्या नातेवाईकांनी केला आहे.

डोंबिवली येथील दीनदयाल रोडवरील ओम साई दत्त येथे राहणाऱ्या भक्ती शिंदे या मैत्रिणींसोबत रात्रपाळीसाठी कामाला जात होत्या. या तिघीही इतरांप्रमाणे पादचारी पुलावरून जात असताना, अचानक पूल कोसळला आणि या तिघींच्या जीवावर काळाने घाला घातला.

भक्ती शिंदे यांना एक ओंकार नावाचा १२ वर्षाचा मुलगा आहे. गुरुवारी घडलेल्या घटनेमुळे ओंकारला त्याच्या आईपासून मुकावे लागले. शिंदे कुटुंबातील खमकी स्त्री समजली जाणारी भक्ती कोणत्याही संकटाने सामोरे जाण्यास तयार राहायची. मात्र, तिचे कुटुंबीय तिच्याप्रमाणे खंबीर नव्हते, या अपघाताने भक्तीच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

दरम्यान, पूल कोसळण्याची घडलेली घटना दुर्दैवी असून या एलफ्स्टिन दूर्घनटेनंतरही सरकारी गंभीर नसल्याचे समोर येत आहे. या पुलांच्या ऑडिटमध्ये मुंबई महापालिका, आयआयटी आणि रेल्वेकडून हलगर्जीपणा झाला असल्याचेही माहिती अधिकारात उघड झाले आहे. त्यामुळे या दूर्घटनेत गेलेले बळी हे सरकारी अनास्थेचे बळीच आहेत. मात्र, भक्ती शिंदेंसारख्यांना अनेकांना जीव गमावावे लागत असले तरी सरकारला मात्र, या गोष्टींचे काही सोयर सुतक नसल्याचे चित्र यातून स्पष्ट होत असल्याची चर्चा नागरिकांमधून केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details