ठाणे -लव, प्यार और धोका या हिंदी चित्रपटाच्या कथानासारखीच धक्कादायक घटना समोर आली आहे. ओळख झालेल्या २४ वर्षीय तरुणींसोबत नराधमाने मैत्रीचे नाटक करून तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर लग्नाचे आमिष दाखवत अभ्यासाच्या नोट्स देण्याच्या बहाण्याने त्याने तिला मामाच्या घरी बोलावले. येथेच कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून बेशुद्धावस्थेतच त्याने तिच्यावर बलात्कार केला.
कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून प्रेयसीवर बलात्कार; गुन्हा दाखल - ठाणे
२४ वर्षीय तरुणींसोबत नराधमाने मैत्रीचे नाटक करून तीला प्रेमाच्या ओढले जाळ्यात ... कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून बेशुद्धावस्थेतच त्याने तिच्यावर केला बलात्कार....
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हर्षल त्याचा कोनगांव येथे राहणाऱ्या मामाकडे राहत असताना त्याची ओळख वर्षभरापूर्वी कोनगाव परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीसोबत झाली होती. त्या ओळखीतून त्याने तिच्याशी मैत्रीचे नाटक करून तिला लग्नाचे अमिष दाखवले. अभ्यासाच्या नोट्स देण्याच्या बहाण्याने मामाच्या घरी बोलावून तिला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून बेशुद्धावस्थेत तिच्यावर बलात्कार केला.
पीडित तरुणीच्या आयुष्याबाबत विचार करून आरोपी हर्षल याने पिडीतेला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही बाब आरोपी हर्षलच्या वडिलांना समजताच त्यांनी तिला मोबाईलवर संपर्क करून तुझी जात कोणती ? आमची जात कोणती ? असे बोलून हेटाळणी केली. हर्षल सोबत लग्न होणार नाही, तुला काय करायचे ते कर, असे बोलून अपमानीत केले. आरोपीच्या वडिलांच्या धमकीनंतर दगाबाज प्रियकर हर्षलनेही लग्नाला नकार दिला. त्यामुळे फसगत झालेल्या पीडित तरुणीने कोनगांव पोलिस ठाणे गाठून अत्याचारी हर्षल याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता कोकाटे करत आहे.