ठाणे- शहरातील नितीन कंपनी जवळील हॉटेल दर्यासागर समोर रस्त्याचे काम सुरू आहे. या दरम्यान, रस्त्याखालून जाणारी गॅस पाईपलाईन फुटून त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याचा प्रकार घडला आहे. मोठा आवाज करत जवळपास अर्धातास ही गॅस गळती सुरू होती. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली होती.
ठाण्यात गॅस वाहिनीला गळती; नागरिकांमध्ये घबराट - CNG
शहरातील नितीन कंपनी जवळील हॉटेल दर्यासागर समोर रस्त्याचे काम सुरू आहे. या दरम्यान, रस्त्याखालून जाणारी गॅस पाईपलाईन फुटून त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याचा प्रकार घडला आहे.
ठाण्यात गॅस वाहिनीला गळती
गॅस गळतीची माहिती मिळताच दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवून रस्ता रिकामा करण्यात आला होता. गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आणि अग्निशमन दलाच्या २ गाड्यांची घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे रस्त्याचे खोदकाम करताना ठेकेदारांकडून रस्ते व त्याखालून जाणाऱ्या पाईपलाईन यांचा पुरेसा अभ्यास करत नाहीत. आज घडलेल्या या घटनेतून त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा ठाणेकरांना आला.