ठाकुर्लीतील खाडी किनारा परिसरात भरदिवसा अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार ठाणे :बलात्कार करुन दोन्ही नाराधमाचा फरार झाले आहेत. पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नराधमांनी बलात्काराचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केल्याचे समोर आले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारच्या सुमारास पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी आपल्या एका मित्रासोबत ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात फिरायला गेली होती. दोघे फिरत असताना दोन अनोखळी नराधम त्या ठिकाणी आले.
पोलीस असल्याची बतावणी :त्यांनी दोघांना धमकत पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर तुमच्या दोघांबद्दल तुमच्या पालकांना कळवण्यात येईल अशी थाप दोघां नराधमांनी दिली. त्यानंतर एकाने एका नराधमाने पीडित विद्यार्थिनीला खाडी किनारी अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याच्या मोबाईलमध्ये बलात्कार करतानाचे चित्रीकरण केले. या प्रकरणी कुठेही वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हारयरल करण्याची धमकी नराधमांनी दिली.
आळीपाळीने बलात्कार : तर दुसरा नराधम पीडिते सोबत असलेल्या मित्राला घेऊन ठाकुर्ली स्टेशन परिसरात आला. त्यावेळी त्या नराधमाने पीडितेच्या मित्राला सांगितले. आमचे साहेब त्या ठिकाणी बसले आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलुन घ्या. त्यानंतर दुसरा नराधम पीडितेच्या मित्राला स्टेशन परिसरात सोडून पुन्हा खाडी किनारी आला. त्याने देखील विद्यार्थिनीवर बळजबरीने बलात्कार केला. दरम्यान, घडलेला प्रसंग पीडित विद्यार्थिनीने आपल्या नातेवाईकांना सांगितला. पीडितेची धक्कादायक घटना ऐकुन नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली. आधी हा प्रकार डोंबिवली जीआरपीकडे गेला. मात्र घडलेला धक्कादायक प्रकार हा डोंबिवली पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पीडित तरुणीला डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले.
गुन्हा दाखल :विष्णुनगर पोलिसांनी काल रात्री बाराच्या सुमारास या प्रकरणात अनोखळी दोन नरधामावर अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे विष्णू नगर पोलिसांनी नराधमांना शोधण्यासाठी पाच पथक तयार केली असून पोलीस नराधमांच्या शोधात आहे. स्टेशन परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये नराधमाची ओळख पटवून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी दिली. तर पीडित तरुणी एका महाविद्यालयात बारावीमध्ये शिक्षण असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे मात्र भर दिवसात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे डोंबिवली एकच खळबळ उडाली आली आहे.
हेही वाचा - IAF Fighter Jets Crashed: वायूसेनेच्या दोन विमानांचा अपघात.. एक मध्यप्रदेशात तर दुसरे पडले राजस्थानात, एक वैमानिक ठार