ठाणे - भिवंडीत फर्निचर कारखान्याला मंगळवारी सायंकाळच्या सुमाराला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील ओसवाल कंपाऊंड परिसरात घडली आहे.
भिवंडीत फर्निचर कारखान्याला आग; कारखाना जळून खाक - officer
कारखान्याला लागलेली आग भडकत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी पाठोपाठ कल्याण व गोदाम परीसरातील खासगी अग्निशामक दलाच्या २ गाड्यांना पाचारण करण्यात आले.
सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील ओसवाल कंपाऊंड परिसरात अंसख्य कारखाने आहेत. आज सायंकाळी अचानक एका फर्निचर कारखान्याच्या आतील भागातून धुर दिसु लागल्याने आतील कर्मचारी बाहेर पळत आले. कर्मचाऱ्यांनी याची माहिती तत्काळ स्थानिकांना दिल्यावर अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. कारखान्याला लागलेली आग भडकत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी पाठोपाठ कल्याण व गोदाम परीसरातील खासगी अग्निशामक दलाच्या २ गाड्यांना पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत होते.
खळबळजनक बाब म्हणजे याच परिसरात अनधिकृत गोदामांवर जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई केली होती. त्यामुळे या आगीतून संशयाचा धुर निघत आहे. दरम्यान आग पुर्णत आटोक्यात आणण्यासाठी अजुन सुमारे तीन तासाचा कालावधी लागणार असल्याची माहीती अग्निशामक दलाचे अधिकाऱ्यांनी दिली आहे.