महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत क्षुल्लक कारणावरून मित्राचा चाकूने गळा चिरुन खून... - पोलीस

एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या गळ्यावर चाकूने वार करून निर्घुण खून केला. ही घटना भिवंडीतील नवीवस्ती नेहरूनगर पहाडी येथे घडली.

भिवंडीत क्षुल्लक कारणावरून मित्राचा चाकूने गळा चिरुन खून...

By

Published : Apr 30, 2019, 12:00 PM IST

ठाणे- लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रात्री मित्रांची मैफिल रंगलेली असताना अचानक दोघा मित्रांमध्ये वाद झाला. या वादात एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या गळ्यावर चाकूने वार करून निर्घुण खून केला. ही घटना भिवंडीतील नवीवस्ती नेहरूनगर पहाडी येथे घडली. अजीम अयुब सैय्यद (वय २५ रा. मुर्गी मोहल्ला) असे मृताचे नाव आहे.

भिवंडीत क्षुल्लक कारणावरून मित्राचा चाकूने गळा चिरुन खून...


जलालुद्दीन मुस्तकीम शेख (वय ३० रा. नवीवस्ती) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मारेकरी जलालुद्दीन याच्या विरोधात भादंवि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


मृत अजीम हा यापूर्वी नवीवस्ती भागात राहत होता. तो अधूनमधून त्याच्या मावस बहिणीकडे नेहमीच येत असे. त्याची बालपणापासून आरोपी जलालुद्दीन मुस्तकीम शेख याच्याशी जिवलग मैत्री होती. ते दोघेही काल रात्री मित्रांसोबत गप्पा गोष्टींमध्ये रंगलेले असताना या दोघांमध्ये क्षुल्लक वाद झाला.


या वादातून जलालुद्दीन याने धारदार चाकूने अजीम याच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला. या हल्यात याचा मृत्यू झाला. यानंतर जलालुद्दीन फरार झाला. त्याच्याविरोधात मृत अजीम याची मावस पुतणी रफिया पप्पू अंसारी हिने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details