महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राच्या पोटात भोकसला चाकू - ठाणे गुन्हे वार्ता

आता याप्रकरणी जखमी मनजीतच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी राजा उर्फ सीकेपीला अटक करून त्याच्याकडून पोलिसांनी चाकूही जप्त केला आहे.

क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राच्या पोटात भोकसला चाकू
क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राच्या पोटात भोकसला चाकू

By

Published : Jan 1, 2021, 2:24 PM IST

ठाणे - सरत्या वर्षाच्या मध्यरात्री रंगात भंग करणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. एका मित्राने क्षुल्लक वादातून मित्राच्याच पोटात धारदार चाकू भोसकून त्याला गंभीर जखमी केले आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर-2 परिसरात घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात मित्रावर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. राजा उर्फ सीकेपी असे हल्लेखोर चरसी मित्राचे नाव आहे, तर मनजीत लबाना असेच चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मित्राचे नाव असून त्याच्यावर उल्हासनगरमधील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

आरोपीने केले जखमीला रुग्णालयात दाखल अन् झाला फरार -

जखमी मित्र मनजीत लबाना हा उल्हासनगरमधील पंजाबी कॉलनी परिसरात राहतो. तो बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर दोन्ही परिसरातील ए-वन दूध डेअरीसमोर मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा मित्र आरोपी राजा यांनी त्याला रस्त्यात थांबवून सरदार लोकांची नावे पोलीस स्टेशनला सांग असे सांगितले. मात्र, त्यास जखमी मनजीतने नकार दिला. मनजीतने नकार देताच आरोपी राजाने त्याच्या कमरेला असलेला धारदार चाकू काढून मनजीतच्या पोटात भोकसला. या हल्ल्यात मनजीत रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून आरोपी राजा यानेच उल्हासनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून तो फरार झाला होता.

आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद -

आरोपी राजा उर्फ सीकेपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर उल्हासनगरच्या विविध पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. आता याप्रकरणी जखमी मनजीतच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी राजा उर्फ सीकेपीला अटक करून त्याच्याकडून पोलिसांनी चाकूही जप्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details