महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत 'तिहेरी तलाक'चा चौथा गुन्हा दाखल, हुंड्यासाठी दिला तलाक

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करुन तिहेरी तलाक दिल्यामुळे पीडितेच्या नवऱ्यासह सासरच्या मंडळीविरोधात भिवंडीत गुन्हा दाखल झाला आहे. तिहेरी तलाक कायद्यान्वये भिवंडीत हा चौथा गुन्हा दाखल झाला आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Feb 20, 2020, 8:07 PM IST

ठाणे- तिहेरी तलाक पद्धतीला कायद्याने बंदी घातली असतानाच हुंड्यासाठी पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाल्याची घटना भिवंडीत घडली आहे. विशेष तिहेरी तलाक बंदी कायदा लागू झाल्यापासून भिवंडीमध्तये अशा प्रकारे तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल झाल्याची ही चौथी घटना आहे.

नुकत्याच घडलेल्या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती मोहम्मद हुसेन अहमद शेख (वय 24 वर्षे), सासरे अस्लम शेख (वय 50 वर्षे), दिर जावेद अस्लम शेख (वय 35 वर्षे), दिर जमशेद अस्लम शेख (वय 32 वर्षे) व नणंद अफसरी अशी तिहेरी तलाक तसेच हुंडा प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत.

पीडित महिलेचा 28 फेब्रुवारी, 2019 रोजी मोहम्मद हुसेन शेख याच्याशी विवाह झाला होता. मात्र, पीडित महिलेच्या माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने माहेरच्यांनी हुंडा दिला नव्हता. यावरून सासरच्या मंडळीशी खटके उडाल्याने पीडित महिला माहेरीच राहत होती. यावेळी सासरच्या मंडळींनी महिलेचे महेर गाठून तिच्या घरी कोणी नसताना तिला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर तीन तलाक देऊन या पीडित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच या महिलेच्या भावाने लग्नात दिलेले सुमारे 1 लाख 6 हजार 700 रुपये किमतीचे सोन्याच्या स्त्रीधनाचा अपहारही केला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता, विविध कालमांसह मुस्लीम महिला (विवाहाच्या अधिकाराचे रक्षण) कायदा कलम चार प्रमाणे शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.

हेही वाचा -'या'साठी करायचे दुचाक्यांची चोरी, अल्पवयीन मुलासह चोरट्याला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details