ठाणे- कुर्ला टर्मिनस येथून गाडी पडकल्यास बसण्यासाठी जागा मिळेल, असा बहाणा करीत प्रवाशांना लुटणाऱ्या चौघांना कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बेड्या ठोकल्या आहेत. खळबळजनक बाब म्हणजे हे चोरटे नशेसाठी पैसे नसल्याने उत्तरप्रदेश, बिहार राज्यातील प्रवाशांना लक्ष करीत लूटमार करीत होते. मोहम्मद खान, अफझल खान, दिन मोहम्मद खान आणि फरमान खान, अशी या लुटारूंची नावे आहेत.
ठाण्यात कुर्ला टर्मिनसवर प्रवाशांना लुटणाऱ्या चौकडीला अटक, अशी करायचे लूट
कुर्ला टर्मिनस येथून गाडी पडकल्यास बसण्यासाठी जागा मिळेल, असा बहाणा करीत प्रवाशांना लुटणाऱ्या चौघांना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
उत्तरप्रदेशातील रहिवासी निलेश प्रसाद हे गेल्या गुरुवारी (२८ मे रोजी) वडील आणि दोन मित्रांसह उत्तरप्रदेशला जाण्यासाठी निघाले होते. ते तिकीट काढण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीजवळ उभे होते. यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना हटकले आणि कुर्ला टर्मिनस येथून गाडी पडकली तर जागा मिळेल अशी, थाप मारली. यानंतर ते प्रसादसह त्याचे वडील आणि दोन मित्रांना कुर्ला टर्मिनस येथे घेऊन गेले आणि इतर दोन मित्रांना बोलाऊन त्यांना चाकूने वारकरत मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळील मुद्देमाल घेऊन गेले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करताना रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत ओळख पटवून या चोरट्यांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान या चोरट्यांना २०१८ साली अशाच एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर हे जामिनावर सुटल्याचे समोर आले. यांचा शोध सुरू असताना हे पुन्हा २६ मे रोजी पुन्हा कल्याण रेल्वे स्थानकावर सावज शोधत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी झडप घालत या चौघांना अटक केली आहे. अटक असलेल्या चौकडीवर यापूर्वीही चार गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून ३ मोबाईल, दोन चाकू, १६ हजार ५०० रूपये रोख, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.