महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 43च्या घरात, तर दोघांचा मृत्यू

गुरुवारी सापडलेल्या नवीन पाच रुग्णांमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 43 वर जाऊन पोहोचला असून, दिवसागणिक कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असल्याचे दिसत आहे.

covid 19 patient
कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, आकडा 43 च्या घरात, तर दोघांचा मृत्यू

By

Published : Apr 9, 2020, 4:31 PM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असून, आज (गुरुवारी) आणखी 5 रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 43च्या घरात पोहोचला आहे. तर आतापर्यंत 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे आज आढळून आलेले हे सर्व पाचही रुग्ण महिला आहेत. ज्यामध्ये डोंबिवली पूर्वतील 2, डोंबिवली पश्चिमेला 1 आणि कल्याण पूर्व येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज सापडलेल्या नवीन पाच रुग्णांमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 43वर जाऊन पोहोचला असून, दिवसागणिक कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एक दिवसाआड भाजीपाला आणि किराणा दुकाने सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, औषध विक्री आणि दवाखाने चोवीस तास सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कोरोनाग्रस्तांची माहिती -

कल्याण पूर्व - 8
कल्याण पश्चिम - 7
डोंबिवली पूर्व - 20
डोंबिवली पश्चिम - 7
टिटवाळा - 1

ABOUT THE AUTHOR

...view details