मुंबई- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशासह संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे मासे विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. मनुष्यबळाचा अभाव असल्याने शहरात कमी प्रमाणात माशांचा पुरवठा होत आहे. तसेच, माशांची गुणवत्ता देखील ढासळल्याने विक्रीवर परिणाम झाल्याचे मासेविक्रेत्यांचे म्हणणे आहे.
मुंबईत मनुष्यबळ नसल्याने मासेविक्री व्यवसाय विस्कळीत - thane fish business
कमी मनुष्यबळामुळे माशांची आयात-निर्यात विस्कळीत झाली आहे. पुरेसे मनुष्यबळ मिळाल्यास मासेविक्रीला पुन्हा गती यईल, असे मत, मासे विक्रेत्यांकडून व्यक्त केले जात आहे.
मासे
लॉकडाऊनमुळे नागरिक बाजारात येण्यास टाळत असल्याने मासेविक्रीच्या व्यवसायाला नुकसानीला समोर जावे लागत आहे. त्याचबरोबर, सध्या मटणाचे भाव वाढले असून शहरात माशांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, कमी मनुष्यबळामुळे माशांचा आयात-निर्यात विस्कळीत झाली आहे. पुरेसे मनुष्यबळ मिळाल्यास मासेविक्रीला पुन्हा गती यईल, असे मत मासेविक्रेत्यांकडून व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा-पोलिसांच्या मदतीसाठी होमगार्डचा वापर करावा, आशिष शेलारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Last Updated : Mar 29, 2020, 1:18 PM IST