महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fire at apartment in Thane : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घराला भीषण आग; आजी आणि नातीचा होरपळून मृत्यू - Fire To House In Thane

कल्याण पश्चिमेकडील अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील घास बाजार येथील शफिक खाटी मिठी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील घराला मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत ७० वर्षीय आजी आणि २२ वर्षीय नातीचा होरपळून मृत्यू झाला आहे. खातीजा हसम माइमकर आणि नात इब्रा रौफ शेख अशी मृतांची नावे आहेत.

Thane Crime
इमारतीला लागलेली आग

By

Published : Jan 17, 2023, 5:21 PM IST

ठाणे : मध्यरात्रीच्या सुमारास दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या घरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र थंडीचे दिवस असल्याने घरातील झोपलेल्या कुटुंबाला जाग आली नाही. दोन तासाने वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर अचानक घरातील हॉलमध्ये प्रथम आग लागली. त्यावेळी आजी आणि नात या दोघी बेडरुममध्ये झोपल्या होत्या. धूर आल्याने नातीच्या लक्षात आले. त्यानंतर त्या दोघींनी खोलीबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉलमध्ये भीषण आग लागल्याने दोघींना बाहेर पडता आले नाही. त्याचवेळी आगीचा भडका उडाल्याने आणि धुराने दोघी गुदमरल्या होत्या.

उपचारापूर्वीच मृत्यू :आगीने काही क्षणात भीषण रूप धरण केले यामध्ये घरातील संसारपयोगी साहित्याची राखरांगोळी होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. घरात झोपलेल्या ७० वर्षीय महिला आजी व तिची २२ वर्षीय नातीन आगीत गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.



आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज :दरम्यान आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाला स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. तर ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवला जात आहे. या दुर्घटनेचचा अधिक तपास बाजारपेठ पोलीस करीत आहेत. मात्र या घटनमुळे घास बाजार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आगीनंतर मार्केटमध्ये एकच खळबळ:उल्हासनगर शहरातील कँम्प नंबर ३ परिसरातील दोन मजली इमारतीमध्ये अहुजा फर्निचर नावाचे शोरूम होते. या इमारतीच्या टेरेसवरच्या मजल्यावर आग अचानक लागल्याने मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली होती. तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले होते. मात्र, या आगीत लाखोंचे फर्निचर जळून खाक झाले होते. कुलिंगचे काम सुरु असून ही आग शॉट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात आला होता. सुदैवाने सोमवारी फर्निचर मार्केट बंद असल्याने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले होते.

हेही वाचा :Pune cops nab sextortion case : केवळ 2200 लोकांच गाव सेक्सटॉर्शनं गाजलं, आरोपीला रायपूर सुकेती येथुन अटक

ABOUT THE AUTHOR

...view details