ठाणे :कोरोनानंतर दोन वर्षांनी दिवाळी सण मोठ्या उत्साहात राज्यभरात साजरा होत (occasion of diwali) आहे. निर्बंध हटवल्यामुळे प्रत्येक जण दिवाळी सण उत्साहात साजरा करताना दिसून येत आहे. सर्वच जण उत्साहात फटाके फोडताना देखील जागोजागी दिसत आहेत. मात्र याच फटाक्यांमुळे 16 आगेच्या घटनांची ठाणे शहरामध्ये नोंद (Fire incidents due to crackers in Thane) झाली.
Fire Due To Crackers : फटाके फोडण्याचा मोह महागात; ठाण्यात तब्बल 16 ठिकाणी आगीच्या घटना
दिवाळी सण मोठ्या उत्साहात राज्यभरात साजरा होत (occasion of diwali) आहे. सर्वच जण उत्साहात फटाके फोडताना देखील जागोजागी दिसत आहेत. मात्र याच फटाक्यांमुळे 16 आगेच्या घटनांची ठाणे शहरामध्ये नोंद (Fire incidents due to crackers in Thane) झाली.
खाजगी मालमत्तेचे नुकसान : या आगीमध्ये कोणीही जखमी नसून जीवित हानी झालेली नाही. मात्र या घटनांमुळे खाजगी मालमत्तेचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. त्यामुळे फटाके फोडत असताना योग्य ती खबरदारी घेऊन फोडावे, असे आव्हान प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत (Fire incidents in Thane) आहे.
'या' ठिकाणी आग : पार्टी नगर कळवा या ठिकाणी रोडजवळ झाडाला आग लागली (Fire Due To Crackers) होती. निळकंठ ग्रीन मुलाबाग डेपोजवळ फ्लेमिंगो बिल्डिंग 27 मजल्यांच्या बिल्डिंगमधल्या विसाव्या मजल्यावर रूम नंबर 2002 मधील वॉशिंग मशीन युनिटला आग लागली होती. साईनगरी सोसायटी समोर चंदनी कोळीवाडा येथे सुकलेल्या झाडाला किरकोळ आग लागली होती. ठाणे रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक एक समोर दादा पाटील वाडीमध्ये वर्षाताई फिटनेस जिममध्ये आग लागली होती. गोल्ड सिनेमासमोर स्टेशन रोड येथे जय हिंद कलेक्शन दुकानावरील प्लास्टिक ताडपत्रीला आग लागली होती. तर दोन कॉल हे फेक असल्याचा देखील अधिकाऱ्यांनी (Fire incidents occasion of diwali) सांगितले.