महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गॅस सिलेंडरच्या गळतीने घराला आग, आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक

आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाची १ गाडी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. तर, वेळेतच मंडोल पती-पत्नीने घराबाहेर पळ काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

fire broke out in thane due to gas leakage
गॅस सिलेंडरच्या गळतीने घराला आग, आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक

By

Published : Mar 21, 2020, 4:02 AM IST

ठाणे-गॅस सिलेंडरमधील गॅसची गळती होवून भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने वेळेतच पती-पत्नीने घराबाहेर पळ काढल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भीषण आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना भिवंडीतील खाडीपार परिसरातील काटई बाग येथील एका घरात घडली आहे.

गॅस सिलेंडरच्या गळतीने घराला आग, आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक

भिवंडीतील काटई बाग परीसरात वंदना घरत यांची खोली असून या खोलीत मनोज मंडोल भाडेकरू राहतात. मनोज यांच्या पत्नीने रात्रीचा स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर सुरु केला. मात्र, काही वेळातच या सिलेंडरमधून गॅस गळती होऊन अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले होते.

गॅस सिलेंडरच्या गळतीने घराला आग, आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक

दरम्यान, आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाची १ गाडी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. तर, वेळेतच मंडोल पती-पत्नीने घराबाहेर पळ काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत घरातील जवळपास सर्वच साहित्य जळून खाक झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details