ठाणे - भिवंडीमध्ये आगीचे सत्र सुरू असून गोदाम पट्ट्यात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील नालापार देवूनगर येथील प्लास्टिक मणी बनवणाऱ्या कारखान्याला आग लागली. आग लागल्याचे समजताच प्रसंगावधान राखत कामगार बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.
भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; मण्यांचा कारखाना जळून खाक - भिवंडी मणी कारखाना आग न्यूज
ठाण्याच्या भिवंडी तालुक्यात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान होते. या आगी विम्यासाठी लावल्या जातात की, आपोआप लागतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आग लागलेल्या कारखान्याच्या तळमजल्यावर फारुख खान यांचा प्लास्टिक मणी बनवण्याचा कारखाना आहे. त्यावरील मजल्यावर दहा खोल्या आहेत. तेथे कामगार राहत होते. रात्री उशिरा कारखान्याला आग लागली. या आगीत कारखान्यातील यंत्रसामुग्री, कच्चा व तयार माल जाळून खाक झाला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या इमारतीच्या समोर असलेल्या भंगार दुकानात धाग्याचे कोम वायंडिंग करण्याचे काम सुरू असताना शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे समजताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाल्या. दोन गाड्यांनी टँकरच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आज सकाळपर्यंत कुलिंगचे काम सुरू होते.
अनलॉकमुळे आता भिवंडीतील सर्वच गोदाम आणि कारखाने सुरू करण्यात आहेत. गेल्या महिन्याभरात या परिसरात लहान-मोठ्या आगीच्या ८ ते १० घटना घडल्या आहेत. या आगी विम्यासाठी लावल्या जातात की, आपोआप लागतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.