FIR Against Sameer Wankhede : एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल - Liquor sales license
एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे (Former NCB director Sameer Wankhede) यांच्याविरुद्ध, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) तक्रारीवरून, कोपरी पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारावर मद्यविक्री परवाना (Liquor sales license) मिळवल्याचा आरोप आहे
ठाणे:एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तक्रारीवरून, कोपरी पीएस, ठाणे येथे बनावट कागदपत्रे दाखल करत खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना (Liquor sales license) मिळवला असल्याचा आरोप आहे. उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांच्या विरोधात वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन हॉटेलसाठी परवाना मिळवल्याची तक्रार दाखल केली होती. त्या नुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयाच्या 17व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीसही बाजवण्यात आली होती.