महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 8, 2022, 10:49 AM IST

ETV Bharat / state

Firing in road on criminal : फिल्मी स्टाईलने केलेल्या गोळीबारात सराईत गुन्हेगाराचा मृत्यू

अज्ञात बाईकस्वाराने सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात गोळीबार ( Firing in road on criminals ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याची हत्या कंत्राटी कामगार पुरविण्याच्या वादातून ( dispute over provision of contract labour ) झाल्याची माहिती समोर आली आहे.

Firing in road on criminal
गोळीबारात गुन्हेगाराचा मृत्यू

ठाणे : ठाण्याहून भिवंडी मार्गे कशेळी गावाच्या हद्दीतून कारमधून जात असताना अज्ञात बाईकस्वाराने सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात गोळीबार ( Firing in road on criminals ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश कोकाटे वय ३३ गोळीबारात मृत्यू झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. खळबळजनक बाब म्हणजे त्याची हत्या कंत्राटी कामगार पुरविण्याच्या वादातून ( dispute over provision of contract labour ) झाल्याची माहिती रात्री उशिरा समोर आली आहे. तर गोळीबार करणारा गणेश इंदुलकर ( Ganesh Indulkar is main accused ) हा मुख्य आरोपी आहे. मुख्य आरोपी गणेश ही सराईत गुन्हेगार असून तो फरार झाला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बल्लाळ


उपचारादरम्यान झाला मृत्यू : मृतक गणेश काल सायंकाळच्या सुमारास ठाण्याहून घरच्या दिशेने कशेळी येथे कारने जात होता. त्याच सुमारास दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या कारचा पाठलाग करत त्याला कशेळी गावाच्या कामिनी जवळ गाठून त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबारा नंतर गंभीर अवस्थेत जखमी गणेश कोकाटेला ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले. मात्र त्याचा काही वेळातच रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार : विशेष बाब म्हणजे मृतक गणेशने गेल्या पाच महिन्यापूर्वी नारपोली पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करून आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यातच दोन महिन्यापूर्वी ठाण्यातील माजीवाडा परिसरात मृत गणेशवर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाला होता. मात्र त्यावेळी तो वाचला, त्यावेळी गोळीबार करणारे 4 आरोपी पोलिसांनी अटकही केले होते. मात्र मुख्य आरोपी गणेश इंदुलकर फरार होता. त्याच दरम्यान त्याने पुन्हा काल सायंकाळच्या सुमारास गणेशवर गोळ्या झाडून त्याची कारमध्येच हत्या केली. दुसरीकडे मृत गणेशने जीवाला धोका असल्याच्या अर्जावर नारपोली पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. जर पोलिसांनी त्याच्या अर्जाचा वेळीच विचार करून गांभीर्याने लक्ष दिले असते तर आज गणेश जिवंत असता अशी प्रतिक्रियाही त्याच्या नातेवाईकांनी दिली.

गंभीर गुन्हे दाखल :मृत गणेश कोकाटेवर रॉबरी, चोरी, तसेच गंभीर हाणामारीचे गुन्हे दाखल असून तो भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात कुटुंबासह राहत होता. गोळीबाराच्या घटनेची नोंद रात्री उशीरा नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गोळीबार करणाऱ्या गणेश इंदुलकर ला पकडण्यासाठी पोलिसांचे ४ पथके रवाना झाली असून भिवंडी ते ठाणे या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासण्यासाठी सुरुवात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details