ठाणे -मुख्यमंत्र्याचे पुत्र तथा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विषयी कल्याण पूर्वेतील शिवसेना महिला पदाधीकारीच्या नावे अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोस्ट व्हायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
खासदार श्रीाकंत शिंदेंच्या विषयी वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल - कल्याण अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
रसाळ यांच्या चौकशीतुन ती पोस्ट अज्ञात व्यक्तीने व्हायरल केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात सायबर कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरू केल्याची माहिती कल्याण पोलीस परिमंडळचे पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे. मात्र, ज्या कारणामुळे खासदार विरोधात पोस्ट व्हायरल झाली. त्याच्या मागचे नेमके कारण काय? याचा शोध पोलीस घेत असले तरी, त्या शिवसेना शाखेचे कुलूप तोडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याबाबत मात्र बोलण्यास कोणीही तयार नसल्याचे दिसून आले आहे.
शाखेचे कुलूप तोडतानाचा व्हिडिओ व्हायरल - मिळालेल्या माहितीनुसार राज्यात शिवसेना व शिंदे गटात सुरु असलेल्या सत्ता संघर्षानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतला. त्यातच काल (बुधवारी ) खासदार शिंदे यांनी कल्याण पूर्वेतील शिवसेना शाखेत जाऊन शिवसैनिकांच्या भेटीगाठी करून चर्चा केली. मात्र त्यावेळी शिवसेना शाखा बंद असल्याचे दिसून आल्याने शाखेचे कुलूप तोडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. तर दुसरीकडे आज मुख्यमंत्र्याचे पुत्र तथा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विषयी कल्याण पूर्वेतील शिवसेनेच्या महिला पदाधीकारी आशा रसाळ यांच्या नावाने खासदार विषयी आपत्तीजनक पोस्ट आज सकाळपासून व्हायरल झाल्याने ठाणे , मुंबई भागातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी घटनेची गांभीर्य ओळखून आशा रसाळ यांना आज सायंकाळच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते.
व्हिडिओ व्हायरल झाला त्याबाबत मात्र बोलण्यास कोणीही तयार नाही - रसाळ यांच्या चौकशीतुन ती पोस्ट अज्ञात व्यक्तीने व्हायरल केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात सायबर कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरू केल्याची माहिती कल्याण पोलीस परिमंडळचे पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे. मात्र, ज्या कारणामुळे खासदार विरोधात पोस्ट व्हायरल झाली. त्याच्या मागचे नेमके कारण काय? याचा शोध पोलीस घेत असले तरी, त्या शिवसेना शाखेचे कुलूप तोडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याबाबत मात्र बोलण्यास कोणीही तयार नसल्याचे दिसून आले आहे.