ठाणे - कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर आचारसहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कल्याण लोकसभेचे अपक्ष उमेदवार विनय दुबे यांनी ठाण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि पोलीस आयुक्ताकडे पत्राद्वारे केली आहे.
खासदार शिंदेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, अपक्ष उमेदवार दुबे यांची मागणी - CANDIDATE
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजऱ्या करण्यात आलेल्या जयंतीमध्ये, उल्हासनगर कॅम्प नंबर ३ मधील एका कार्यक्रमात बेकायदेशीर बॅनर लावून खासदार शिंदे आणि शिवसेना पक्षाचा प्रचार केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजऱ्या करण्यात आलेल्या जयंतीमध्ये, उल्हासनगर कॅम्प नंबर ३ मधील एका कार्यक्रमात बेकायदेशीर बॅनर लावून खासदार शिंदे आणि शिवसेना पक्षाचा प्रचार केला. अशाप्रकारे शिवसेना पक्षाचा प्रचार आणि प्रसार केल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विनय दुबे यांनी केला आहे. याबाबतचे फोटो आणि पुरावेही त्यांनी निवडणूक आयोगाला दिले असून श्रीकांत शिंदे यांच्यासह उपस्थित पदाधिकारी आणि आयोजकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.