दुष्काळग्रस्त शेतमजुरांचे भिवंडीत स्थलांतर; पोटाची खळगी भरण्यासाठी गुंतले नालेसफाईच्या कामात - water
तीव्र उन्हाळा असल्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष सुरू आहे. त्यामुळे शेतीची कामे बंद झाली आहेत. परिणामी शेतमजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटूंबीयांसह भिवंडी शहराच्या आश्रयाला आला आहे.
ठाणे - सद्या सर्वत्र रेकॉर्डब्रेक तीव्र उन्हाळा असल्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष सुरू आहे. त्यामुळे शेतीची कामे बंद झाली आहेत. परिणामी शेतमजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटूंबीयांसह भिवंडी शहराच्या आश्रयाला आला आहे. येथे त्याला नालेसफाईची काम करून उदरनिर्वाह करावा लागत आहे.
सध्या शहरात भिवंडी महानगरपालिकेमार्फत ठिकठिकाणी गटार, नालेसफाई सुरू झाली आहे. त्यापैकी नदीनाका, चाविंद्रा, नागाव, खंडूपाडा आदी भागात रोजंदारी कामगारांकडून नालेसफाई सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी स्थलांतरीत कामगार समाधानकारक काम करत आहेत. तर वंजारपट्टी नाका येथील उड्डाणपुलाखाली वास्तव्य करून त्यांनी उघड्यावर संसार थाटून त्याच ठिकाणी स्वयंपाक करून आपली भूक भागवित आहेत.
पंधरा दिवसानंतर पावसाला सुरुवात होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यास आम्ही लवकरच गावाकडे परत जाणार आहोत, अशी माहिती या मजूरांनी दिली आहे.