ठाणे :खांबावरून विजेची तार तुटून पडल्याने त्या तारेच्या संपर्कात आलेल्या एक शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. हि घटना बदलापूर शहराच्या वेशीवर असलेल्या साई वालिवली गावाच्या हद्दीत घडली आहे. यावेळी शेतकऱ्या सोबत असलेल्या तीन म्हशींचाही (Farmer and Buffalo Death Thane) मृत्यू झाला आहे. तर शांताराम भोपी (वय ६० )असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
कमी दाब विद्युत वाहिनी तुटून अपघात:बदलापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक झाडे कोसळली आहेत. शिवाय महावितरणाचे अनेक खांबही यात धोकादायक अवस्थेत आहेत. त्यातच बदलापूरजवळील साई वालिवली ग्रामपंचायत हद्दीत आज (सोमवारी) सकाळी १० वाजल्याच्या सुमारास एका खांबावरून कमी दाब विद्युत वाहिनी तुटून झालेल्या अपघातात शांताराम भोपी यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत त्यांनी चारण्यासाठी नेलेल्या तीन म्हशींचाही यात दुर्दैवी अंत झाला आहे. महावितरणाच्या स्थानिक उपअभियंत्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.