महाराष्ट्र

maharashtra

दूषित पाणी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर छापा; कारखाना सील

By

Published : Mar 17, 2020, 10:57 AM IST

अंबरनाथ शहरातील पाणी टंचाईचा फायदा घेत शहरात अनेक बाटली बंद पाण्याचे कारखाने सुरू आहेत. अशाच एका पाणी कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन आणि एमपीसीबी(महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ) विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली.

contaminated water
दूषित पाणी विक्री

ठाणे - बाटली आणि प्लास्टिक पाऊचमध्ये दूषित पाणी भरून विक्री करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन आणि एमपीसीबी(महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ) विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली. 'जलपरी' नावाचा हा कारखाना अंबरनाथ शहरातील बारकुपाडा परिसरात आहे. कारवाई करुन हा कारखाना सील करण्यात आला आहे.

दूषित पाणी विक्री करणाऱ्या कारख्यान्यावर छापा

अंबरनाथ शहरातील पाणी टंचाईचा फायदा घेत शहरात अनेक बाटली बंद पाण्याचे कारखाने सुरू आहेत. बारकुपाडा परिसराती जलपरी या नावाने बाटली बंद पाण्याचा कारखाना सुरू होता. मात्र, या कारखान्यातून दूषित पाणी विक्री होत असल्याची तक्रार स्थानिकांनी दिली. त्यानुसार एका संयुक्त पथकाने कारखान्यावर कारवाई केली.

हेही वाचा -कोरोनावर औषध शोधल्याचा ऑस्ट्रेलियातील संशोधकांचा दावा, अमेरिकेतही 'क्लिनिकल ट्रायल' सुरू

या कारखान्यात बंदी असलेल्या प्लास्टिकच्या लहान पाऊचमध्ये पाणी भरून ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात विक्री होत होती. कारखान्याचा पाणी विक्रीचा परवाना संपुष्टात आला असतानाही पाण्याच्या बाटल्यांची विक्री या कारखान्यातून केली जात होती.

याच कारखान्याला लागून असलेल्या एका घरात प्लास्टिकच्या पाऊचमध्ये पेप्सी विक्रीचा कारखाना सुरू होता. अतिशय गलिच्छ अशा ठिकाणी हा पेप्सीचा कारखाना सुरू करून बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर पेप्सी बनवण्यासाठी केला जात होता. या कारखान्याच्या एका शौचालयात पाच ड्रममध्ये पेप्सीच्या पाण्याचासाठा करून ठेवला होता. यातून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू होता.

ABOUT THE AUTHOR

...view details