ठाणे - स्मार्ट सिटीच्या दृष्टीने वाटचाल करीत असलेल्या ठाणे शहरातील विविध प्रकल्पाचा अभ्यास अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी करणार आहेत. महापालिका राबवित असलेल्या प्रकल्पाची प्राथमिक माहिती स्मार्ट सिटी लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी सोमवारी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना दिली. यावेळी उप आयुक्त संदीप माळवी उपस्थित होते.
अभियांत्रिकीचे विद्यार्थी करणार ठाणे शहरातील विविध प्रकल्पांचा अभ्यास - study
ठाणे महापालिका विविध प्रकल्प राबवित असते. आता स्मार्ट सिटीच्या दृष्टीने वाटचाल करीत असलेल्या ठाणे शहरातील विविध प्रकल्पाचा अभ्यास अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी करणार असून प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्ररित्या याचा अहवाल देखील सादर करणार आहेत.
ठाणे महापालिका विविध प्रकल्प राबवित असते, या प्रकल्पाची माहिती ही शहरातील नागरिकांसोबतच अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना देखील व्हावी यासाठी हे विद्यार्थी महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा अभ्यास करणार आहेत. या प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थी स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना, डिजी ठाणे, शहरविकास विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध प्रकल्प आदींचा अभ्यास करणार आहेत. याबरोबरच प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्ररित्या याचा अहवाल देखील सादर करणार आहेत.
या प्रशिक्षण कालावधीत त्यांना अभ्यासासोबत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार असून उत्कृष्ट अहवाल सादर करणाऱया विद्यार्थ्यांचा गौरव देखील स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा अभ्यास हा निश्चितच या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोगी पडणार असून त्या दृष्टीने त्यांनी अभ्यास करावा असे देखील अतिरिक्त आयुक्त उन्हाळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.