ठाणे -चंदनवाडीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वृद्ध कोरोनाबाधित रुग्णाला ११ तासांनंतरही रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रिक्षेतून कोविड रुग्णालयात नेण्यात आले आहे. एकीकडे ठाणे महापालिका प्रशासन सर्व सुविधा उपलब्ध असल्याच्या बाता करत असताना दुसरीकडे रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कोरोना बाधिताला चक्क रिक्षातून कोविड रुग्णालय गाठावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
११ तासांनीही मिळाली नाही रुग्णवाहिका, अखेर रिक्षातून गेले कोव्हिड रुग्णालयात हेही वाचा -नैतीकदृष्ट्या पदावर राहणे योग्य नसल्याने राजीनामा दिला -अनिल देशमुख
११ तास उलटूनही रुग्णवाहिका नाही
राज्यभरासह ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाकाठी हजोरो रुग्ण ठाण्यात आढळून येत आहेत. मात्र, महानगरपालिका प्रशासन कोरोना विषाणू हाताळण्यात किती ढिम्म असल्याचे उदाहरण समोर आले आहे. ठाण्याच्या चंदनवाडी येथे राहणाऱ्या एका 76 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली. दुपारी 12च्या दरम्यान पालिकेच्या वॉर रूमला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला पुढील उपचारासाठी ग्लोबल रुग्णालयात दाखल करायचे असल्याचे सांगत रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, ११ तास उलटूनही रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे अखेर रात्री ११ वाजता नातेवाईकांनी रिक्षातून रुग्णाला दवाखान्यात दाखल केले. गेल्या वर्षभरापासून आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रामाणिक काम करत आहेत. मात्र, आता वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णवाहिका कमी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पालिका प्रशासनाचा दिखावूपणा
राज्य सरकारने लॉकडाऊन संदर्भात कान उघडणी केल्यानंतर ठाणे पालिका प्रशासनाने मागच्या आठवड्यात यूटर्न घेतला होता. पुरेशा रुग्णवाहिका आणि बेड्स उपलब्ध असल्याची खात्री पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा -शेअर बाजार कोसळला; बीएसईमध्ये 1200 तर एनएसईमध्ये 300 अंकांची घसरण