ठाणे- शुक्रवार सकाळपासूनच ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ठाण्यातही सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला असल्याने ठाणे रेल्वे स्टेशन रोड येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या मासुंदा तलाव येथे रस्त्यावर पाणी साचलेले पाहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही गटार सफाई आणि नालेसफाईचा बोजवारा या ठिकाणी उडालेला पाहायला मिळतो आहे.
ठाण्यात नाले सफाईचा बोजवारा, रेल्वे रुळावर आले पाणी
पावसाचा जोर वाढला असल्याने ठाणे रेल्वे स्टेशन रोड येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या मासुंदा तलाव येथे रस्त्यावर पाणी साचलेले पाहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही गटार सफाई आणि नालेसफाईचा बोजवारा या ठिकाणी उडालेला पाहायला मिळतो आहे.
ठाण्यात नाले सफाईचा बोजवारा
हा परिसर सखोल भाग आहे. याठिकाणी सक्षम पंप लावणे गरजेचे असून यासंबंधी पालिकेकडे नागरिकांनी वारंवार सूचना केल्या असताना देखील या ठिकाणी सक्षम पंप न लावण्याने ही परिस्थिती उद्भवते आहे. याचा त्रास वाहन चालक आणि नागरिकांना सहन करावा लागतो आहे. जर असाच मुसळधार पाऊस सतत पडत राहिला तर मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.