ठाणे- शहरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे मुंबई-गुजरातला जोडणारा महामार्ग बंद करण्यात आला आहे. घोडबंदर रोडवरील काजुपाडा परिसरामध्ये रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे.
ठाण्यात पावसामुळे घोडबंदर रोड बंद; वाहतूक खोळंबली - heavy rain
जोरदार पाऊस होत आहे. रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे मुंबई गुजरातला जोडणारा हायवे बंद करण्यात आला आहे. घोडबंदर रोडमधील काजुपाडा परिसरामध्ये रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे.
ठाण्यात घोडबंदर रोड पावसाने बंद
हजारो वाहने वाहतूक कोंडीमध्ये अडकली आहेत. सकाळपासून पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, वर्षानुवर्षे या ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीची भावना बघायला मिळत आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा.