महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील बिघाडामुळे ठाणे जिल्ह्याची बत्तीगुल - महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील बिघाड
महापारेषण कंपनीच्या उच्चदाब वीज वाहिनीवरून वीज पुरवठा होणाऱ्या अंबरनाथ , उल्हासनगर, भिवंडी ग्रामीण ,बदलापूर, कल्याण पूर्व, डोंबिवली, एमआयडीसी, ठाणे, कळवा, आदी परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित होण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना असून १० वाजता खंडीत झालेला वीज पुरवठा काही शहरात ५५ मिनिटांनी पूर्ववत झाला आहे. तर काही ठिकाणी अध्यापही वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
ठाणे - महापारेषणच्या भिवंडी तालुक्यातील पडघा उपकेंद्रातील ट्रान्समीशनकडून येणारी उच्च दाबाची मुख्य वाहिनीत दोष निर्माण होऊन स्फोट झाल्याने ठाणे जिल्ह्यासह मुंबईतील अनेक शहरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. बिघाड दुरूस्त करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून वीज ग्राहकाना काही काळ वीज पुरवठापासून वंचित राहावे लागेल असल्याने महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महापारेषण कंपनीच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीत आज सकाळी १० वाजल्याच्या सुमारास अचानक बिघाड झाला. महापारेषण कंपनीच्या उच्चदाब वीज वाहिनीवरून वीज पुरवठा होणाऱ्या अंबरनाथ , उल्हासनगर, भिवंडी ग्रामीण ,बदलापूर, कल्याण पूर्व, डोंबिवली, एमआयडीसी, ठाणे, कळवा, आदी परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित होण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना असून १० वाजता खंडीत झालेला वीज पुरवठा काही शहरात ५५ मिनिटांनी पूर्ववत झाला आहे. तर काही ठिकाणी अध्यापही वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे.