ठाणे - मातृदिनाचे औचित्या साधून महिलांच्या सन्मानार्थ प्रा. डॉ. सुनील कर्वे यांनी ठाणे शहरात प्रौढांसाठी आणि मुला-मुलींसाठी मोफत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. खास उन्हाळ्यानिमित्त गाण्यांचा कार्यक्रम, कविता वरिष्ठांसाठी स्मृतीआड गेलेल्या खेळांची उजळणीसह उन्हाळी शिबिराचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम ठाण्यातील गावंडबाग येथील नानानानी पार्कमध्ये पार पडला.
ठाण्यात मातृदिनानिमित्त महिलांसाठी अनोखा कार्यक्रम; गृहिणी माताभगिनींचा उत्स्फुर्त सहभाग - dr sunil karve
गेल्या ३ वर्षांपासून हे कार्यक्रम डॉ. कर्वे घेत आहेत. मात्र, यंदा प्रथमच महिलांसाठी ठाण्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम राबवला. बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. सुनील कर्वे यांनी केल्याचे सांगितले.
दररोजच्या गराड्यात अडकलेल्या मातांना एकदिवस लहानपणीच्या खेळांच्या दुनियेत रमता यावे, या हेतूने प्रा डॉ. कर्वे यांनी या कार्यक्रमाची संकल्पना आखली होती. गेल्या ३ वर्षांपासून हे कार्यक्रम डॉ. कर्वे घेत आहेत. मात्र, यंदा प्रथमच महिलांसाठी ठाण्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम राबवला. बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. सुनील कर्वे यांनी केल्याचे सांगितले.
डॉ. कर्वे यांनी मनोरंजनाबरोबरच एक महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या मुला-मुलींना असे पारंपरिक खेळ शिकवा त्यांना खेळायला लावा. त्यामुळे त्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास सुलभ होईल, हल्ली बरेचसे पालक आपल्या पाल्यांना बाहेर कुठे खेळायला जाऊ देत नाहीत. मोबाइलमुळे मुले घराबाहेर खेळायलाही जात नाही. या खेळात सहभागी झालेल्या सर्व महिला आणि मुलांनी डॉ. कर्वे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानले.