महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण 'असे' घडले; आत्तापर्यंत ३३ आरोपींना अटक - सामूहिक बलात्कार घटना

पंधरा वर्षांच्या अल्पवीयन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेला ब्लॅकमेल करून शीतपियामधून गुंगीचे औषध देऊन आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी ३३ आरोपींना आतापर्यंत अटक केली असून आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खळबळजनक बाब म्हणजे या गुन्ह्यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. शिवाय पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त केली आहे.

डोंबिवली पोलीस
डोंबिवली पोलीस

By

Published : Sep 27, 2021, 4:38 PM IST

ठाणे -डोंबिवलीची सांस्कृतिक नगरी म्हणून जगभरात ओळख आहे. अशी ओळख असणारे हे शहर सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. एका पंधरा वर्षांच्या अल्पवीयन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेला ब्लॅकमेल करून शीतपियामधून गुंगीचे औषध देऊन आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी ३३ आरोपींना आतापर्यंत अटक केली असून आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खळबळजनक बाब म्हणजे या गुन्ह्यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. शिवाय पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त केली आहे.



व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार

पीडित मुलगी डिसेंबरमध्ये एका नातेवाईकाच्या संपर्कात येऊन मुख्य आरोपी असलेल्या तरुणाची भेट घडवून दिली. त्यांनतर सोशल मीडियावरून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर अत्याचार करताना मोबाइलमध्ये चित्रीकरण केले होते. याच व्हिडिओच्या आधारे पीडितेवर सुमारे साडे आठ महिने विविध ठिकाणी नेऊन तिला शारिरीक संबंधांसाठी भाग पाडले जात असे. विशेष म्हणजे तिने सुरूवातीला या सगळ्याला नकार दिला. मात्र पीडितेचे विवस्त्र व्हिडिओ तसेच शारीरिक संबंधांचा व्हीडिओही मोबाइलवर शूट करण्यात आला. तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार आरोपीनी अत्याचार केले, असे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.

हुक्का ओढण्यासही भाग पाडले

ज्या कथित प्रियकराने व्हिडिओ चित्रीकरण केले. त्याने ते इतर मित्रांना पाठवले, शिवाय एक व्हाट्सअप ग्रुपही बनवत त्यामध्ये आरोपीना सामील केले. त्यामुळे आरोपींची संख्या वाढत गेले. पहिल्यांदा हा प्रकार घडला तेव्हा पीडितेने सगळ्यांचे नंबर डिलीट केले होते. तिने या अत्याचारी आरोपींना भेटायला नकार दिला. मात्र तिला ब्लॅकमेल करण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर हे अत्याचाराचे सत्र सुरू झाले. तिला थम्सअप सारखे कोल्डड्रिंक देण्यात आले. त्यात पावडर टाकण्यात आली होती. तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. शिवाय अश्लील व्हिडिओ दाखवून हुक्का ओढण्यासही भाग पाडले जात असे. फेब्रुवारी, मार्च, मे या महिन्यांमध्ये हे प्रकार घडले आहेत.

अब्रूची किंमत ५०० रुपये

सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने संबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला मित्रांच्या तर स्वाधीन केलेच, शिवाय तिच्या अब्रूची किंमत ५०० रुपये लावल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. तिच्यावर आठ ठिकाणी नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला. तेव्हा एका ठिकाणी बलात्कार झाल्यावर दोघेजण मुख्य आरोपीला ५०० रुपयांच्या दोन नोटा देत होते. तिला जाळ्यात फसविल्यावर तिचा पैसे कमावण्याचे साधन म्हणून आरोपीने वापर केला होता. हेदेखील आता पोलीस तपासात उघड झाले आहे. शिवाय काही आरोपींनी तर अत्याचार करतेवेळी काही गडबड होऊ नये, म्हणून कंडोमच्या ठिकाणी प्लस्टिक पिशवीचा वापर केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी मे महिन्यातच दखल घेतली असती तर ...

अत्याचारित मुलगी ५ मे रोजी बेपत्ता झाली. तेव्हा तिच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र मे महिन्याच्या 6 तारखेला अंमलदार कक्षातील अंमलदारांनी फारसे लक्ष दिले नाही आणि त्यानंतर इतका मोठा अत्याचाराचा झाला. पीडितेच्या आईने ६ मे रोजी आपल्या मुलीची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करायला गेली होती. यातील काही आरोपींनी पीडित मुलाला रात्रभर बाहेर राहण्यास भाग पाडले होते. आई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेली. मात्र तेथील अंमलदारांनी आधी सगळीकडे शोध घ्या, मग या, असे उत्तर दिले. तसेच मोबाइलमधला फोटो नकोय, पासपोर्ट फोटो आणा, असा सल्ला देऊन तिच्या आईकडे कथितरीत्या पाठ फिरवणे तत्कालीन अंमलदारांना महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यातून निघालेली आई घरी पोहोचेपर्यंत मुलगी परत आली होती. मात्र तेव्हाच तत्कालीन ठाणे अंमलदारांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तक्रार दाखल करवून घेतली असती, तर मात्र इतका मोठा अत्याचार घडला नसता. खात्री पटल्यानंतर पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. आता याच पीडितेच्या आईच्या जबानीवरून या अत्याचारकांडाला कलाटणी मिळाली आहे. मानपाडा पोलिसांनी दाखवलेली उदासीनता त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण; कठोर कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details