ठाणे : डोंबवली पूर्वेतील आयरे-दत्तनगर परिसरातील आदिनारायण नावाची तीन मजली धोकादायक इमारत शुक्रवारी (15 सप्टेंबर) कोसळली होती. आदिनारायण सोसायटीची ही इमारत जुनी झाली होती. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेने या इमारतीमधील रहिवाशांना कालच (गुरुवारी) दुसरीकडे स्थलांतरीत होण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास इमारत कोसळल्याची घटना घडलीय.
- 50 वर्षीय सुनील लोढाया नामक व्यक्तिला ढिगाऱ्याखालून जिवंत काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मात्र, काही वेळातच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सुनील लोढाया यांची पत्नी अजून ढिगाऱ्याखाली अडकली होती. त्यांना ढिगाऱ्याखालून सुरक्षितपणे काढण्यात आलयं. आता केवळ एक जण ढिगाऱ्याखाली अडकला आहे. उशिरापर्यंत हे बचावकार्य सुरू राहिलं.
पालिका प्रभाग अधिकाऱ्याने बजावलेल्या नोटीसनंतर काही कुटुंबानी सुरक्षितस्थळी जाण्याचा निर्णय घेतला. तर काही कुटुंब अजूनही या इमारतीत वास्तव्यास होते. याशिवाय कल्याण डोंबिवलीत काल रात्री आणि आज सकाळीदेखील पाऊस सुरु होता. या दरम्यान ही इमारत कोसळली आहे. या घटनेत दोन जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना ढिगाऱ्या खालून काढण्याचे काम सुरू आहे. अरविंद संभाजी भाटकर (७०) आणि गीता लोधाया (४५) असे ढिगाऱ्याखाली दबलेल्यांची नावे आहेत.
काही कुटुंबांना सकाळपासून घराबाहेर काढण्याचे काम सुरू-दुर्घटना ग्रस्त इमारत ही ५० वर्षापूर्वी लोड बेअरिंग पध्दतीने बांधलेली आहे. या इमारतीमध्ये अ एकूण ४४ कुटुंब राहत होती. ही इमारत अतिधोकादायक असल्याने महापालिकेच्या ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी या इमारतीमधील रहिवाशांना सदनिका खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. काही कुटुंब या इमारतीमधील घरे सोडून यापूर्वीच अन्यत्र राहण्यास गेली आहेत. काही कुटुंबांना शुक्रवारी सकाळपासून घराबाहेर काढण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून सुरू होते