महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! रबडीतून गुंगीचे औषध देऊन बांधकाम व्यावसायिकाचा तरुणीवर बलात्कार - भिवंडी शहर पोलीस स्टेशन

डॉ. रामकुवर यादव (रा. कल्याण पूर्व, नांदिवली) असे त्या नराधमाचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

bhiwandi police station
भिवंडी पोलीस स्टेशन

By

Published : Feb 26, 2020, 5:31 PM IST

ठाणे - 27 वर्षीय तरुणीला जेवणासाठी ढाब्यावर नेत रबडीत गुंगीचे औषध देत तिच्यावर नराधम बांधकाम व्यावसायिकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकाविरोधात तक्रार दिली असून त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. डॉ. रामकुवर यादव (रा. कल्याण पूर्व, नांदिवली) असे त्या नराधमाचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कल्याण पूर्वेमध्ये मावशीच्या घरी राहते. ती लहान असतानाच तिचे आईवडिलांचे निधन झाल्याने तिचा सांभाळ मावशी करत होती. पीडित तरुणी एका मॉलमध्ये कामावर असून ती राहण्यासाठी रूम शोधत होती. गेल्याच आठवड्यात तिच्या मावशीने तिला बांधकाम व्यावसायिक असलेल्या नराधम डॉ. रामकुवर याच्या कल्याण पूर्वेतील कार्यालयात घेऊन गेली. मावशीने नराधमाला पीडितेची हकीकत सांगितल्याने तो तिला स्वतः रूम देण्यासाठी तयार झाला होता. त्याने पीडित तरुणीचा मोबाईल नंबर घेऊन तुला लवकरच रूम दाखवतो म्हणून तिचे आधारकार्डही घेतले.

आठवड्याभरानंतर तरुणीला रूम दाखवण्यासाठी त्याच्या कारमधून घेऊन गेला. त्याचे भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे सांगत तिला मुंबई-नाशिक मार्गावर घेऊन आला. दरम्यान, जेवणाची वेळ झाल्याचे सांगून एका ढाब्यावर गाडी थांबवून तिथे पीडितेने आरोपी डॉ. रामकुवर त्याच्या एका भागीदारासोबत जेवण केले. जेवणानंतर स्वीट म्हणून आरोपीने रबडीची ऑर्डर दिली. मात्र, मधुमेहाचा त्रास असल्याचे सांगत आरोपी व त्याच्या भागीदाराने रबडी घेतली नाही. तर, पीडितेने ती रबडी एकटीनेच खाल्ली. त्यानंतर चक्कर येत असल्याचे तिने सांगितले. चक्कर येते म्हणून त्याने तिला आराम करण्याच्या बहाण्याने ढाब्याशेजारी असलेल्या लॉजवर नेले. लॉजमध्ये आरोपी व पीडिता गेल्यावर त्याने पुन्हा तिला पाणी पिण्यास दिले. ते पाणी पिऊन पीडिता बेशुद्ध झाल्याचे पाहून नराधम डॉ. रामकुवर याने तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर ती शुद्धीवर येताच तिला घडलेला प्रकार समजल्याने तिने वाद घातला. त्यावेळी या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास तुला ठार मारून टाकेन, अशी धमकी देत, फुकट रूम देण्याचे आमिषही तिला दिले. मात्र, पीडित तरुणीने घरी आल्यावर तिच्यावर घडलेला प्रसंग मावशीला सांगितला. मावशीने पीडितेला घेऊन भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात जात नराधम डॉ. रामकुवर याच्याविरोधात कलम ३७६, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकूण लागताच नराधम डॉ. रामकुवर फरार झाला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय दीपक भोई करत आहेत.

हेही वाचा -

भाजपचा एल्गार : शेतकरी, महिला सुरक्षतेबाबत सरकार अपयशी; भाजपचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

सावरकरांच्या प्रस्तावाबाबत अध्यक्ष योग्य निर्णय घेतील - अजित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details