महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Infant Sale Racket: बालकांची खरेदी-विक्री केलेल्या डॉक्टरला अटक केल्यावर ७१ बालकांची सुटका

नवजात बालकांची खरेदी-विक्री करणाऱ्या डॉक्टरकडून 71 बालकांची सुटका करण्यात आली आहे. ( 71 Children Released ) ही घटना ठाणे येथे घडली. डॉ. केतन सोनी असे पोलिसांनी अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. ( Accused Dr. Ketan Soni )

By

Published : Nov 27, 2021, 5:10 PM IST

Updated : Nov 27, 2021, 5:39 PM IST

nandadeep foundation
नंदादीप फाऊंडेशन

ठाणे - नवजात बालकांची खरेदी-विक्री करणाऱ्या डॉक्टरविरोधात दोन दिवसापूर्वी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात ( Ramnagar Police Station ) गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली होती. विशेष म्हणजे ठाणे महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आणि चाईल्ड लाईन या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पाठपुराव्यानंतर पुन्हा कल्याणातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात ( Bazar Peth Police Station Kalyan ) आरोपी डॉक्टरवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्या तावडीतून ७१ बालकांची सुटका केली आहे. डॉ. केतन सोनी असे पोलिसांनी अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. ( Accused Dr. Ketan Soni )

जिल्हा बालसंरक्षण अधिकारी याबाबत माहिती देताना

१ लाखात बाळाच्या सौदेबाजीमुळे बालकांची सौदेबाजी उघड -

डोंबिवली येथील दाम्पत्याचे प्रिया आणि संतोष अहिरे यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. प्रिया यांची डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयात १० नोव्हेंबर रोजी प्रसूती झाली होती. सदर महिला रुग्णालयातून घरी गेल्यावर डॉ. सोनी यांनी ज्यांना मूल नाही त्यांना तुमचे बाळ द्या, असे या पती पत्नीला सांगितले होते. त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी पती-पत्नी आपले पाच दिवसांचे बाळाला घेऊन डोंबिवली पूर्वेतील गणपती मंदिराजवळ गेले. त्यावेळी आरोपी डॉ. सोनी यांनी इंग्रजीत काहीतरी लिहलेल्या कागदावर दोघांच्या सह्या घेऊन पत्नी व पतीला १ लाख रूपये देऊन आरोपी डॉ. सोनी बाळाला घेऊन निघून गेले. आरोपी डॉक्टरचा कल्याण परिसरात होमिओपॅथिक दवाखाना आहे.

विक्री केलेल्या बाळाचा परत विषय काढायचा नाही -

आपले बाळ विक्री केल्याने प्रियाच्या मनाला ते पटले नाही. त्यामुळे तिने १७ नोव्हेंबरला आरोपी डॉ. सोनी यांना फोन करून बाळ परत द्या, मी तुमचे पैसे परत देते, असे सांगितले. मात्र, आता परत बाळाचा विषय काढायचा नाही, असे डॉ. सोनी यांनी त्यांना उलट सुनावले. ही बाब या पती-पत्नीने सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौहान यांना सांगितली. त्यानंतर आरोपी डॉ. केतन सोनी यांना एक लाख रुपयाला विकले अशी तक्रार प्रकाश चौहान यांनी केली. महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अधिकारी डॉ. पल्लवी जाधव यांना फोनद्वारे त्यांनी ही तक्रार दिली. त्यानुसार डॉ. जाधव यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड व बालकल्याण समितीने केलेल्या मार्गदर्शनानुसार या प्रकरणाचा तपास सुरु केला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा - Infant sale नवजात बालकांची खरेदी-विक्री करणाऱ्या डॉक्टरला बेड्या; 'हा' धक्कादायक प्रकार आला समोर

आरोपी अनाथ मुलाच्या नावाने करायचा खरेदी-विक्री -

आरोपी डॉ. केतन सोनीचे कल्याण-पश्चिम भागातील टिळक चौक परिसरात एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर नवदीप फाऊंडेशन नावाने अनाथ व गरजू मुलांचे वसतीगृह आहे. याच वसतिगृहात तो बालकांना डांबून ठेवून त्यांचा छळ करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्यावेळी या वसतिगृहात बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. त्यावेळी एका खोलीत ७१ मुले डांबून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आली होती. यामध्ये २३ अल्पवयीन मुलींचा समावेश असून मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आदी शहरातून आरोपीने ही बालके शासनाची तसेच संबधित विभागाची परवानगी न घेताच बेकायदेशी डांबून ठेवून त्यांचा छळ केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या तावडीतून ७१ बालकांची सुटका केली. आता या सर्व बालकांना शासकीय बालसुधार गृहात पालनपोषणसाठी ठेवून त्यांच्या पालकांचा शोध सुरू केला आहे, अशी माहिती ठाणे बालसंरक्षण अधिकारी डॉ. पल्लवी जाधव यांनी दिली.

दरम्यान याआधीही रामनगर पोलीस ठाण्यामध्ये बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ८० व ८१ नुसार संगनमताने बाळाची विक्री केल्याबद्दल प्रिया आणि संतोष अहिरे तसेच डॉ. सोनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये जिल्हा बालसंरक्षण अधिकारी डॉ. पल्लवी जाधव यांच्यासह सखी वन स्टॉप सेंटरच्या सिद्धी तेलंगे, ठाणे चाईल्ड लाईनच्या श्रद्धा नारकर व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चव्हाण सहभाग होता.

Last Updated : Nov 27, 2021, 5:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details