महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोविड सेंटर महिला अत्याचार : सखोल तपास करून आरोपीला फाशी द्या, चित्रा वाघ यांची मागणी - bjp leader chitra wagh

ज्या कोविड सेंटरमध्ये महिला उपचारासाठी दाखल होतात. त्याठिकाणी विनयभंग, बलात्कार सारख्या घटना घडत आहेत. अजून किती घटनांची वाट हे सरकार पाहत आहे, अशी खरमरीत टीका वाघ यांनी ठाकरे सरकारवर केली.

चित्रा वाघ
चित्रा वाघ

By

Published : Sep 14, 2020, 8:37 PM IST

ठाणे- भाईंदर पूर्वेच्या कोविड सेंटरमध्ये सुरक्षारक्षकाकडून महिलेवर अत्याचाराची घटना समोर आली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. या प्रकरणी ठाकरे सरकारला विरोधी पक्षांनी चांगलेच धारेवर धरले आहे. या प्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेचा सखोल तपास करून आरोपीला फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकच्या माध्यमातून कोविड रुगणांवर उपचारासाठी कोविड हेल्थ सेंटर उभारण्यात आले आहेत. भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट परिसरातील कोविड सेंटरमध्ये सुरक्षारक्षकाकडून एका २० वर्षीय महिलेवर अत्याचार, तसेच तिचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. संबंधित आरोपीला नवघर पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. परंतु, या प्रकारानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका होत आहे.

माहिती देताना भाजप नेत्या चित्रा वाघ

यावर पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. कोविड सेंटर मधील ही पहिला घटना नसून या अगोदर देखील महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. मागील ४ महिन्यापासून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसओपीची मागणी करत आहे. परंतु, हे सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत उदासीन आहे. ज्या कोविड सेंटरमध्ये महिला उपचारासाठी दाखल होतात, त्याठिकाणी विनयभंग बलात्कार सारख्या घटना घडत आहेत. अजून किती घटनांची वाट हे सरकार पाहत आहे, अशी खरमरीत टीका वाघ यांनी ठाकरे सरकारवर केली.

तसेच, अशा घटना घडल्यानंतर आजपर्यंत एकही प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई झाली असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे, या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.

हेही वाचा-'मराठा आरक्षण टिकवणे, ही सरकारची जबाबदारी; त्यासाठी सरकार प्रयत्न करतेय'

ABOUT THE AUTHOR

...view details