ठाणे- कोरोना विषाणूच्या संकटात सर्वसामान्य नागरिकांसाठी ऑनड्युटी राहून लढणाऱ्या पोलिसांना कोव्हिड19 पासून बचावासाठी गोळ्यांचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी 'अर्सेनियम अल्बम' या गोळ्यांचे होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गोळ्या पोलीस आयुक्तालयातील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागाने तयार करण्यात आल्या आहेत. ड्युटीवरील पोलीस हे नागरिक, आरोपींच्या संपर्कात येत असल्याने संसर्ग होण्याची भीती असल्याने सावधगिरी ही घेण्यात आली आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ठाण्यात पोलिसांना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप - immune system
रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी 'अर्सेनियम अल्बम' या गोळ्यांचे होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गोळ्या पोलीस आयुक्तालयातील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागाने तयार करण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने सर्वत्र भितीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना करोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये होणारा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांच्या स्वास्थ्यासाठी भारत सरकारने सुचवलेल्या निर्देशाप्रमाणे होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यातील तसेच बंदोबस्तावरील पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेतील पोलीस, त्यांचे कुटुंबीय यांना देखील या गोळ्या देण्यात आल्या आहेत. 15 मे पर्यंत सदर गोळ्यांच्या 22 हजार बॉटल्स तयार करून त्यांचे वाटप करण्यात आले आहे. तर पुढील काळात 50 हजार बॉटल्स गोळ्या बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.