ठाणे- कोरोनाच्या भीतीने हजारो बेघर आणि गोरगरीब लोक गावांच्या दिशेने पायी निघाले आहेत. त्यामध्ये काही गोरगरीब, मजूर आणि बेघर लोक आहेत. ज्यांना गावी जाता आले नाही, तसेच 2 वेळेच्या जेवणाची देखील सोय नाही, अशा सर्वांची ठाणे महापालिका, ठाणे पोलीस आणि सामाजिक संस्थांनी शहरातच सुरक्षित स्थळी सोय केली आहे.
Coronavirus : बेघरांच्या निवाऱ्याची एकनाथ शिंदेंनी केली पाहणी, शहरात फवारणीचे दिले आदेश - ठाणे जिल्हा बातमी
या प्रकारे शेकडो लोकांची सोय दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये करण्यात आली आहे. या सर्वांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व गोरगरिबांना चादर, टॉवेल, मास्क आणि सॅनिटाजरचे वाटप करुन त्यांच्या जेवणासोबतच निवाऱ्याची सोय देखील करण्यात आली आहे.
बेघरांच्या निवाऱ्याची एकनाथ शिंदेंनी केली पाहणी
या प्रकारे शेकडो लोकांची सोय दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये करण्यात आली आहे. या सर्वांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व गोरगरिबांना चादर, टॉवेल, मास्क आणि सॅनिटाजरचे वाटप करुन त्यांच्या जेवणासोबतच निवाऱ्याची सोय देखील करण्यात आली आहे. त्याबरोबरच एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील सर्व कोपऱ्या-कोपऱ्यात आणि रस्त्यांवर जंतुनाशकांची फवारणी करा, असे आदेश दिले आहेत.
Last Updated : Mar 30, 2020, 7:48 AM IST