महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरात घुसून चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथखाला 24 तासांत लावला छडा

मीरारोड पूर्वेला ओस्तवाल आर्चीड इमारतीमध्ये शुक्रवारी (दि. 27 मार्च) सकाळी 11 च्या सुमारास एक व्यक्ती घरात घुसून वृद्ध महिलेला वार करत तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने व इतर साहित्य, असा दीड लाखांचा मुद्देमाल चोरला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासांच्या आत एखाला अटक केली आहे.

thane
आरोपीसह पोलीस पथक

By

Published : Mar 27, 2021, 9:55 PM IST

Updated : Mar 27, 2021, 10:41 PM IST

मीरा भाईंदर(ठाणे) -मीरारोड पूर्वेला ओस्तवाल आर्चीड इमारतीमध्ये शुक्रवारी (दि. 27 मार्च) सकाळी 11 च्या सुमारास एक व्यक्ती घरात घुसून वृद्ध महिलेला जबर मारहाण करून सोने व इतर साहित्य, असे 1 लाख 50 हजारांचे ऐवज लुटून पसार झाले. गुन्हे शाखेच्या पथक 1 ने 24 तासांत आरोपीला अटक केली आहे.

दिवसाढवळ्या घरात घुसून दरोडा

शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मीरारोड पूर्वेच्या ओस्तवाल आर्चीड इमारतीमध्ये चोरीची घटना समोर आली आहे. एकटी वृद्ध महिला बघून आरोपीने घर विकत घ्यायचे आहे, असे सांगून घरात प्रवेश केला तर एक बाहेर उभा होता. या वृद्ध महिलेवर सहा वार करत गंभीर जखमी केले. त्यानंतर वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत एकूण 1 लाख 50 हजारांचे ऐवज लुटले आणि तेथून पळ काढला. वृद्ध महिलेच्या नातलगांनी तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर मीरा भाईंदर वसई विरार गुन्हे शाखेच्या पथक एकने तपास सुरू करत 24 तासात राशीद शकील खान (रा. पठाणवाडी, मालाड) येथील असल्याची माहिती प्राप्त झाली. राशीद शकील खान याला ठाण्यातून ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असतात्याने गुन्हा केल्याचे कबूल केले.

गुन्ह्यातील आरोपी आतंरराष्ट्रीय गुन्हेगार

मीरा भाईंदर वसई विरार गुन्हे शाखा 1 च्या पथकाने आरोपी राशीद शकील खान याला अटक केल्यानंतर चौकशी केली असता अनेक घटना समोर आल्या आहेत. राशीने अनेक लोकांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे लुटले तसेच मुंबई येथील डोंगरी पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा देखील दाखल असल्याचे निष्पन्न झाले. इतकेच नव्हे तर दुबईमध्येही आरोपी राशीद शकील शेख याला शिक्षा झाल्याचे उघड झाले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिकदृष्ट्या तपास करून आरोपीला अटक केले आहे.

हेही वाचा -जिल्हास्तरावर कार्यकर्त्यांसाठी जनता दरबार - नाना पटोले

Last Updated : Mar 27, 2021, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details