ठाणे -दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुण-तरुणीने (Suicide of a Loving Couple) भिवंडी-कल्याण मार्गावरील दुर्गाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या (Couple Commits Suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. प्रशांत गोडे (वय 22 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या सोबत असलेल्या तरुणीचे नाव समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले असून हे प्रेमीयुगुल (Suicide of a Loving Couple) असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा -Kadam Vs Parab : गद्दार कोण मी.. की अनिल परब? रामदास कदम यांचा सवाल
मृत प्रशांत हा कल्याणहून भिवंडीला जाणाऱ्या मार्गाने दुचाकीवरून एका तरुणीसोबत आज सायंकाळच्या सुमारास जात होता. मात्र दुर्गाडी पुलावर येताच त्या दोघांनी दुचाकी पुलावरच साईटला लावून अचानक पुलाच्या कठड्यावरून खाडीच्या पाण्यात (Commits Suicide by Jumping into Bay) उड्या मारल्या. घटनेची माहिती कोनगाव पोलिसांना मिळताच त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने तासाभरात प्रशांतचा मृतदेह खाडी पात्रातून बाहेर काढत उत्तरणीय तपासणीसाठी भिवंडीच्या स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात नेला.