ठाणे- उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णायात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसोबतच कोरोनाबाधित संशयित रुग्णांवर एकाच (वार्डात) ठिकाणी उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे रुग्णांची कोरोना चाचणी अहवाल उशिराने मिळत असल्याने रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
कोरोना संशयित रुग्ण आणि इतर रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार कोरोना होण्याचा धोका अधिकउल्हासनगरचे मध्यवर्ती शासकीय रुग्णालय कोविड रुग्णालय नाही. तरीदेखील कोरोनाची लक्षणे असलेले अनेक रुग्ण सामान्य रुग्नांसोबतच उपचार घेत आहेत. त्यामुळे इतरही रुग्नांना व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना कोरोना होण्याचा धोका अधिक आहे. विशेष म्हणजे कोरोना संशयित रुग्णांची चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल यायला चार दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागत आहेत. परिणामी सामान्य रुग्णांच्या वार्डात त्यांच्यावर उपचार करण्यावाचून डॉक्टरांना पर्याय नसल्याचे सांगण्यात आले. शिवाय कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याशिवाय कोरोनासाठी असलेल्या रूग्णालयात या रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. सध्या असे अनेक कोरोना रुग्ण मध्यवर्ती रुगणालायत उपचारासाठी फिरत आहेत. या सगळया प्रकारामुळे इतर रुग्ण, डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी बाधित होण्याची शक्यता वाढली आहे.
रुग्णांना घेऊन जायचे कुठेउल्हासनगर शहरात सध्या महापालिकेचे एकमेव कोविड रुग्णालय आहे. मात्र, त्यांची बेड क्षमता संपल्याने रुग्णांना घेऊन जायाचे कुठे? असा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांसमोर समोर उभा आहे. तर काही तांत्रिक अडचण असल्याने कोरोना चाचणी अहवाल उशिरा येत असल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.