नवी मुंबई -पनवेल येथील इंडिया बुल्स या कोविड सेंटरच्या 14व्या मजल्यावरून कोरोनाबाधित रुग्णाने आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधित व्यक्तीचे नाव संतोष पाटील असून, सुदैवाने त्याला वाचविण्यास यश आले आहे.
पत्नीचा केला होता खून
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर संतोषला पत्नी संध्या हिने उपचारासाठी न नेता त्याला गॅलरीत विलगीकरणात ठेवले होते. हाच राग मनात धरून संतोषने शनिवारी 24 तारखेला पत्नीशी वाद घातला. त्यानंतर तिच्या डोक्यात कोयत्याने वार करत तिचा खून केला.
मुलाला भेटण्याचा हट्ट; नकार देताच कोरोनाबाधित आरोपीचा कोविड सेंटरमध्ये आत्महत्येचा प्रयत्न - कोरोनाबाधित आरोपाचा आत्महत्येचा प्रयत्न
संतोष कोरोनाबाधित असल्यामुळे पत्नीने त्याला गॅलरीत विलगीकरणात ठेवले होते. हा राग मनात धरून त्याने पत्नी संध्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिचा खून केला होता.
पोलिसांनी करोनाबाधित असल्याने ठेवले कोरोना सेंटरमध्ये
पत्नीचा खून केल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी आरोपी संतोषला ताब्यात घेतले. मात्र, तो कोरोना कोरोनाबाधित असल्यामुळे त्याला इंडिया बुल्स येथील कोविड सेंटरमध्ये ठेवले आहे.
मुलाला भेटायला जाण्याचा केला हट्ट व त्यातून आत्महत्येचा प्रयत्न
आरोपी संतोष याला एक मुलगा आहे. कोविड सेंटरमध्ये त्याने मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला बाहेर सोडण्यास कोविड सेंटर तसेच पोलीस प्रशासन यांनी नकार दिला. त्यातून हट्टाला पेटून त्याने इंडिया बुल्स कोविड सेंटरच्या 14व्या मजल्या वरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. सुदैवाने संतोषला वाचविण्यात यश आले आहे.