महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ही तलवार गणेश नाईकांसाठी... जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची घसरली जीभ - गणेश नाईंकासाठी तलवार

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या वक्तव्याने गणेश नाईक आणि आव्हाड यांच्यात एका वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उद्घाटन प्रसंगी आव्हाड यांनी तलवार हाती घेताच प्रशांत पाटील या कार्यकर्त्याने 'ही तलवार गणेश नाईकांसाठी' आहे, असे बेताल वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र यावर आव्हाड यांनी गप्प बसणे पसंत केले आहे. तसेच यावर गणेश नाईक यांचीही काहीही प्रतिक्रिया आली नाही.

Jitendra Awhad vs ganesh naik
ही तलवार गणेश नाईकांसाठी..

By

Published : Sep 21, 2020, 7:03 AM IST

नवी मुंबई (ठाणे)- नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं भाजप नेते आमदार गणेश नाईक व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात आठ महिन्यांपूर्वी वाकयुद्ध रंगलं होत. 'एका भाषणादरम्यान हिंदी चित्रपटातील डायलॉग मारत गणेश नाईक यांनी आव्हाडांना बापाला बोलावण्याचं आव्हान दिले होते. त्यानंतर काही कालावधीत हे वादळ शमल असे वाटत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केलेल्या वक्तव्याने आणखी एका वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

ही तलवार गणेश नाईकांसाठी..

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड नवी मुंबईत एका ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या हातातली तलवार पाहून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची जीभ घसरली आणि त्याने गणेश नाईक यांच्यासाठी वादग्रस्त वक्तव्य केले. उद्घाटन प्रसंगी आव्हाड यांनी तलवार हाती घेताच प्रशांत पाटील या कार्यकर्त्याने 'ही तलवार गणेश नाईकांसाठी' आहे, असे बेताल वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र यावर आव्हाड यांनी गप्प बसणे पसंत केले आहे. तसेच यावर गणेश नाईक यांचीही काहीही प्रतिक्रिया आली नाही.

नाईंकाच्या समर्थकांनी ही घेतला समाचार-

गणेश नाईंकांनी अशा अनेक प्रकारच्या तलवारी पाहिल्या आहेत. आणि अनेक तलवारीही त्यांनी म्यान करायला लावल्या आहेत. सर्व सामान्य जनतेला सोबत घेऊन जाण्याचा ध्यास, नवी मुंबईचा विकास अशा अनेक तलवारी गणेश नाईकांच्या हाती तळपल्या आहेत. त्यामुळे त्या कार्यकर्त्याने आधी उंची तपासावी मग अशी भाषा करावी असा सल्ला देत नाईक समर्थकांनींही पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details