ठाणे :महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यापासून राजकीय खलबत वाढले आहेत. त्यामुळे ठाण्यात गुन्हेगारी कारवायांत सुद्धा वाढ झालेली पहायला मिळते आहे. पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत केलेले आरोप, तसेच वादग्रस्त क्लिप त्यानंतर सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर जीवघेणा हल्ला असे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे.
खासदार श्रीकांत शिंदेवर गंभीर आरोप : उद्धव ठाकरे शिवसेसेनेचे खासदार, सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदेवर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी जीवे मारण्यासाठी ठाण्यातील गुंडाला सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्याच्या या आरोपाने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यामुळे ठाण्यात येणाऱ्या काळात कायदा, सुव्यवस्था धोक्यात येणार कि काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठाण्यात राजकीय वातावरण गढूळ : ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग याना मंगळवारी उद्धव ठाकरे सेनेचे खासदार, सामना दैनिकांचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी लेखी पत्र दिले आहे. ठाण्यातील कायदा, सुव्यवस्था किती सुरक्षित आहे? असा प्रश्न निर्माण केला आहे. ठाण्यातील परिस्थिती धोकादायक आहे याची जाणीव राऊत यांनी करुन दिली आहे. त्यामुळे ठाण्यात राजकीय वातावरण पूर्वीपासूनच गढूळ झालेले असून याचेच पडसाद अवघ्या महाराष्ट्राच्या राजकारणावर पडत आहेत.
काय लिहले आहे पत्रात ?उद्धव ठाकरे शिवसेनेचेखासदार संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग याना दिलेले लेखी पत्रांने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेली आहे. खासदार संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्ताना लिहलेल्या पत्रात खात्रीलायक माहिती दिली. कि, राऊत यांच्या हत्येचा कट, सुपारीची खलबते ठाण्यात घडल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. सरदचा आरोप फार जबाबदारीने करीत असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात लिहले आहे.