एकनाथ शिंदेंना नाना पटोलेंचा खोचक टोला ठाणे : पहिली जाहिरात छापण्यात आली त्या जाहिरातीमध्ये दाढीवाले बाबा पुढे होते. त्यानंतर भाजप मंडळाची चलबिचल होताच आठ दिवसामध्ये दुसरा सर्वे आला. त्यामध्ये तर आमचे नागपूरचे पुन्हा येईन वाले आले. मग दाढीवाल्यांचे 50 जे होते, त्या 50 मध्ये 15 निवडून येतील असा त्यांचा सर्वेमध्ये दाखवत होते. म्हणजे बाबांचा कार्यक्रम ठरलेल्या आहे. हे त्या जाहिरातीवरून स्पष्ट होते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे नाव न घेता खोचक टोला लगावला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे कल्याण पश्चिम भागातील आचार्य अत्रे रंगमंदिरात कल्याण - डोंबिवली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या निर्धार मेवाळ्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आले होते. त्यावेळी पटोले यांनी भाजपसह शिंदे गटाच्या शिवसेनेवर सडकून टीका केली.
शिंदेंना पदाची लालसा? :साहेबांची बंडखोरी यशस्वी झाली नसती तर त्यांनी त्याचवेळी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असे वक्तव्य शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी केले. या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, हा कोणाचा लोभ आहे, तेच लोक लोभाचे उदाहरण देत आहेत. बघा काय परिस्थिती असेल, पदाची लालसा किती असेल, राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी हे सरकार नाही. मी मुख्यमंत्री होऊ शकतो, यावर राजकारण करण्याची मानसिकता या लोकांची आहे, अशी टीका त्यांनी शिंदे सरकारवर केली आहे.
दुसऱ्याचे घर बरबाद करणे यालाच भाजप पुण्य समजते :भाजपचे मला नवल वाटते. ऑपरेशन लोटसच दुसऱ्याचे घर बरबाद करीत आहेत. महाराष्ट्राची जनता इतकी दुधखुळी नाही. लोकशाहीच्या विरोधातील भाजपचे काम आहे. महाराष्ट्राची जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची एका वृत्तपत्रात मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये त्यांनी मुंबई ते सुरत आणि सूरत ते गुवाहाटी आमदारांचा प्रवास, ऑपरेशन लोटस संदर्भात काही खुलासे केले आहेत. रवींद्र चव्हाण यांचा या मुलाखतीवर नाना पटोले यांनी टीका केली आहे.
तर येत्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार :डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, भाजप पदाधिकाऱ्याला अटक केली जात नाही. तर पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे. शिवसेनेकडून अधिकाऱ्याची पाठराखण केली जात असल्याचा भाजपचा आरोप आहे. तर दुसरीकडे पीडित महिलेने आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी ठाण्यासमोर उपोषण सुरू ठेवले आहे. या प्रकरणावर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी संतप्त सवाल उपस्थित करीत या प्रकरणी संबंधित महिलेला न्याय मिळाला नाही, तर हा प्रश्न येत्या अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा -NCP Anniversary : मला विरोधी पक्षनेते पदामध्ये इंटरेस्ट नाही; संघटनेचे कोणतेही पद द्या - अजित पवार